लातूर : प्रतिनिधी
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भूगोल विषयाचे सहयोगी प्रा. डॉ. राजाराम दावणकर यांना सिम्बॉयसिस कॉलेज पुणे यांच्या वतीने दि. ३० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, कृषी संचालक एस. एस. सावंत, पिंपरी चिंचवडचे उपमहापौर निलेश बोराटे, सिम्बॉयसिस कॉलेजचे संचालक महेश व्यवहारे, जिल्हा सत्र न्यायालयातील अॅड. संजना यांच्या हस्ते प्रा. डॉ.राजाराम दावणकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मानाबद्दल प्रा. डॉ.राजाराम दावणकर यांचे संस्थेचे सचिव प्राचार्य अंगदराव तांदळे, प्राचार्य डॉ. बालाजी कांबळे, लक्ष्मण दावणकर, डॉ. शिवाजी गाडे, डॉ. शहाजी चव्हाण, डॉ. अर्जुन पवार प्रा. श्रीराम नरवडे, प्रा. मन्मथ पंचाक्षरी, डॉ. श्रीनिवास भंडे, ग्रंथपाल शामसुंदर उबाळे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
















