28.4 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeलातूरबाजार समितीचे व्यवहार आजपासून सुरु

बाजार समितीचे व्यवहार आजपासून सुरु

लातूर : प्रतिनिधी
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील खरेदी दाराकडील हमाली १६ टक्के वाढ देणार असल्याचे दि. २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय झाला असून आज दि. २४ एप्रिलपासून लातूर बाजार समितीचे खरेदी व्यवहार सुरु होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांनी दिली आहे.
यासंदर्भात मंगळवारी बाजार समितीच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यात हमाल माथाडी बोर्डाचे अध्यक्ष मंगेश झोले, बाजार समितीचे संचालक बालाप्रसाद बिदादा, संचालक सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे अजय शहा, ग्रेस सिड असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग मुंदडा, दाल मील असोसिएशनचे अध्यक्ष हुकुमचंद्र कलंत्री, शशिकांत मोरालवार, विजय  पल्लोड, लाळूशेठ कचोळ्या, हमाल संघटनेचे अध्यक्ष बालाजी जाधव, रज्जाक शेख, भारत कांबळे, सवई सोनवणे बाजार समितीचे सचिव बी. डी. दुधाटे, सहसचिव एस. टी. भोसले, कार्यालयीन अधीक्षक अरविंद पाटील आदि उपस्थित होते.
मंगळवारी झालेल्या बैठकीत बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, हमाल माथाडी बोर्डाचे अध्यक्ष मंगेश झोले यांच्या आवाहनास प्रतिसाद देवुन हमाली दरवाढ मान्य केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व व्यवहार आजपासून सुरु होणार असून सर्व शेतीमालाचे सौदे निघणार आहेत यासाठी सर्व शेतक-यांनी, बाजार समितीच्या घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR