29.9 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeलातूरमांजरेश्वर हनुमान मंदिरात  जन्मोत्सव उत्साहात साजरा 

मांजरेश्वर हनुमान मंदिरात  जन्मोत्सव उत्साहात साजरा 

लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील श्री मांजरेश्वर हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने मंदिरात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २३ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने  कालाच्या कीर्तनाने समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती तर ह. भ .प. आत्माराम शास्त्री आळंदीकर यांच्या काल्याचे किर्तनाने समारोप करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात भावी भक्त्तांची उपस्थिती होती. हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम सोहळयास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे,  बळवंतराव काळे, सुहास काळे, गुरुनाथ गवळी, वारकरी मंडळाचे अध्यक्ष लालासाहेब देशमुख, बाळासाहेब कदम, संभाजी रेड्डी, संभाजी सुळ, दयानंद बिडवे, सतीश पाटील, विकास देशमुख, तुकाराम गोडसे, बाळासाहेब बिडवे, श्रीनिवास शेळके, श्रीकृष्ण काळे, हनुमान कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी यांच्यासह भाविक भक्त्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते फोडली दहीहंडी
श्री मांजरेश्वर हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरु होत. मंगळवारी काल्याचे कीर्तन दहीहंडी फोडण्यासाठी उपस्थित हभप आत्माराम शास्त्री महाराज आळंदीकर यांनी कार्यक्रमास प्रमुख अतिथी असलेले माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना आपण दहीहंडी फोडावी, अशी विनंती केली ती मान्य करत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. त्यावेळी दिलीपराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR