30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयबाबरी, गुजरात दंगल,हिंदुत्वाचे राजकारण हे विषय वगळले

बाबरी, गुजरात दंगल,हिंदुत्वाचे राजकारण हे विषय वगळले

नवी दिल्ली : एनसीआरटीच्या बारावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात अयोध्या वादावरील मजकूर बदलला आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्याचा संदर्भ तीन ठिकाणांहून हटवला आहे. दंगलींच्या संदर्भात पीडितांच्या धर्माचा उल्लेख देखील टाळण्यात आला आहे.

रामजन्मभूमी आंदोलन आणि २०१९ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भर देण्यात आला आहे. तसंच पुस्तकातून गुजरात दंगलीवरील परिच्छेद हटवला आहे. पूर्वीच्या पुस्तकात ‘मुस्लीम विरोधी गुजरात दंगल’ असा उल्लेख होता. महिन्याभरात अभ्यासक्रमात नवे पुस्तक अपेक्षित आहे.

एनसीआरटीने गुरुवारी (४ एप्रिल) आपल्या वेबसाइटवर हे बदल जाहीर केले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांमध्ये ठउएफळ पुस्तके वापरली जातात. देशातील उइरए बोर्डाशी संलग्न शाळांची संख्या जवळपास 30 हजारांवर आहे. उइरए बोर्डाच्या शाळा भारताच्या जवळजवळ प्रत्येक भागात आहेत. इतर राज्यांच्या बोर्डांच्या पुस्तकांमध्येही आगामी काळात बदल दिसून येतील.
अयोध्येवर काय लिहिले होते?

बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकानुसर ‘भारताचे राजकारण-नवा अध्याय’ या आठव्या धड्यामध्ये अयोध्या वादाचा मजकुर हटवण्यात आला आहे. या धड्यातील राम जन्मभूमी आंदोलन आणि अयोध्या वादावरील वादग्रस्त मजकूर हटवण्यात आला आहे. या विषयी एनसीआरटी चे म्हणणे आहे की, काळानुरुप बदल करण्यात आले आहेत.

गुजरात दंगलीसह हे विषय बदलण्यात आले
‘भारताचे राजकारण-नवा अध्याय’ या धड्यातील बाबरी मशीद आणि हिंदुत्वाचे राजकारण’चे संदर्भही काढून टाकण्यात आले आहेत. या धड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर कसे बांधले गेले हे देखील स्पष्ट केले आहे. ‘डेमोक्रेटिक राइट्स’ या शिर्षकाच्या पाचव्या प्रकरणात गुजरात दंगलीचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. एनसीईआरटीचे म्हणणे आहे की, ही घटना २०वर्षे जुनी आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे न्यायनिवाडा करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR