40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeअंतरराष्ट्रीयतैवानमधील भूकंपानंतर मृतांची संख्या १० वर; हजारो लोक जखमी

तैवानमधील भूकंपानंतर मृतांची संख्या १० वर; हजारो लोक जखमी

तैपेई : तैवानमध्ये बुधवारी झालेल्या भूकंपाने मोठे नुकसान झाले आहे. या शक्तिशाली भूकंपात 10 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे. तर १०७० जण जखमी झाले आहेत. तैवानची राजधानी तैपेईमध्ये बुधवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.५ इतकी मोजली गेली, जी धोकादायक श्रेणीत मोडते. हा भूकंप गेल्या २५ वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप मानला जात आहे, त्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून अनेक लोक दुर्गम भागात अडकले आहेत.

तैवानमध्ये राहणा-या सर्व भारतीय नागरिकांना मदत आणि मार्गदर्शनासाठी हेल्पलाइनही जारी करण्यात आली आहे. तैवानला झालेल्या शक्तिशाली भूकंपाच्या एका दिवसानंतर गुरुवारी बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांच्या शोध घेतला जात आहे. दरम्यान, मृत १० लोकांपैकी किमान चार तारोको राष्ट्रीय उद्यानात होते.
नॅशनल फायर एजन्सीच्या मते, सुमारे ७०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत, त्यापैकी ६०० हून अधिक लोक तारोको येथील सिल्क प्लेस नावाच्या हॉटेलमध्ये अडकले आहेत. परंतु हे सर्व लोक सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR