बेकायदेशीर नामांतर प्रकरणी चौकशीची मागणी

पूर्णो : शहरातील सर्व्हे क्रमांक २५/१ व २५/२ संदर्भातील कथित बेकायदेशीर नामांतर व हस्तांतरण प्रकरणामुळे पूर्णा नगर परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. संबंधित प्रकरणात नियमबा पद्धतीने नामांतर झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचा-यांची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नामांतर संदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी संबंधित नामांतराची नोंद रद्द केली आहे. मात्र, कथित बेकायदेशीर नामांतर प्रक्रिया करणा-या अधिकारी व कर्मचा-याविरूध्द अद्याप कोणतीही प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. ही प्रक्रिया कोणाच्या आदेशाने किंवा संमतीने पार पडली याचीही निष्पक्ष व सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

याशिवाय, पूर्णा नगर परिषदेत यापूर्वी अशा प्रकारची किती नामांतरे अथवा मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरणे झाली आहेत त्यांचीही स्वतंत्र चौकशी करून संबंधित नोंदींची पडताळणी करावी अशी मागणी पुढे येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत. दोषी आढळणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news