भारताने ३-० ने मालिका जिंकली

अफगाणिस्तानचा तिस-या सामन्यातही दारुण पराभव
मुंबई : प्रतिनिधी
भारताने तिस-या आणि अखेरच्या वनडे सामन्यात अफगाणिस्तान संघावर ९ विकेटने मात करत मालिका ३-० ने खिशात घातली. अफगाणिस्तान संघाच्या २१९ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालची नाबाद ११० धावांची खेळी आणि रोहित शर्माच्या ७९ धावांच्या अर्धशतकाने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवले होते. प्रसिद्ध कृष्णा याच्या ५ विकेटने अफगाणिस्तान बॅकफूटला गेली होती.

तत्पूर्वी अफगाणिस्तान संघाचा कॅप्टन हशमतुल्लाच्या शतकी खेळीने २०० धावांचा टप्पा पार केला होता. मात्र भारताच्या फलंदाजीसमोर त्यांचे आव्हान तोकडे ठरले. कॅप्टन शुभमन गिलने आपल्या नेतृत्त्वाखाली पहिलीच वनडे मालिका नावावर केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये पार पडलेली ही पहिलीच वनडे मालिका भारताने ३-० ने जिंकली.

अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज ५ धावा, इब्राहिम जादरान ११ धावा, दरविश रसूली १ धाव आणि रहमत शाह ५ धावांवर या चौघांना आऊट करत झकास सुरुवात करून दिली होती. यातील सुरुवातीच्या तिन्ही विकेटचे कॅच स्लिपला फिल्डिंग करत असलेल्या रोहितने घेतले. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी यश लवकर मिळवून दिले नाही. हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरजाई यांनी १०५ धावांची भागीदारी केली होती. दोघांनी अफगाणिस्तानला ३६ वरून १४१ पर्यंत आणले. अजमतुल्ला ५० धावा करून माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद नबीसोबत शाहिदीने ५७ धावांची भागीदारी करत २०० धावांपर्यंत पोहोचवले. नबी गेल्यावर मात्र शाहिदीला इतर कोणी साथ दिली नाही. शेवटपर्यंत एकटा टिकून राहिला आणि आपल्या करियरमधील शतक करत २१८ पर्यंत संघाला पोहोचवले.

भारताकडून सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी १७० धावांची सलामी दिली. त्यामुळे भारताने सामन्यावर नियंत्रण मिळवले होते. पण रोहित शर्मा ७९ धावांवर असताना मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाला. रोहितने ९ चौकार आणि ३ षटकार मारले होते तर यशस्वी जयस्वालने दुसरे शतक ठोकले. ८६ चेंडूत ११४ धावांची खेळी करताना १४ चौकार आणि ३ षटकार मारले. प्रसिद्ध कृष्णा, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल विजयाचे शिल्पकार ठरले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news