26.6 C
Latur
Wednesday, March 4, 2026
Homeअंतरराष्ट्रीयभारतावरील २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ रद्द?

भारतावरील २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ रद्द?

रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याने दिलासा?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी २५ टक्के आणि त्यानंतर रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अतिरिक्त २५ टक्के असे एकूण ५० टक्के टॅरिफ भारतावर लादला होता. आता भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याने अमेरिकेने सकारात्मक संकेत देत नरमाईची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात भारतावर लादलेले अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ रद्द होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारतावर रशियन तेल खरेदीमुळे लादलेले २५ टक्के टॅरिफ हटवण्यासंदर्भात एक मार्ग काढला जाऊ शकतो, असे म्हटले आहे. पॉलिटिकोला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताने रशियन क्रूड ऑईलची खरेदी कमी केली आहे. यामुळे टॅरिफ आता हटवले जाऊ शकते, असे म्हटले. स्कॉट बेसेंट यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाचे हे यश असल्याचे म्हटले आहे.

रशियन तेल खरेदी केल्यामुळे आम्ही भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादले होते. आता भारतीय रिफायनरींकडून रशियन तेल खरेदी जवळपास बंद करण्यात आली. हे मोठे यश आहे. २५ टक्के टॅरिफ अजूनही लागू आहे. आता ते हटवण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरू होण्यापूर्वी भारतातील तेल रिफायनरी कंपन्या रशियन क्रूड ऑईल २-३ टक्के खरेदी करत होत्या. मात्र, युद्धामुळे पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध घातले असता रशियाने सवलतीच्या दरात तेल विक्री सुरु केली. भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली. भारताची रशियन तेलाची खरेदी १५-१९ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. यामुळे भारतीय रिफायनरींना मोठा नफा झाला. त्यावेळी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादत रशियन तेल खरेदीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला.

भारताने सुरू केली
इतर देशांकडून खरेदी
स्कॉट बेसेंट यांच्या मते भारतीय रिफायनरीज रशियाकडून तेल खरेदी कमी करत असून त्या पश्चिम आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेकडून तेल खरेदी करत आहेत. स्कॉट बेसेंट यांनी युरोपमधील देश रशियाविरोधात बोलतात. मात्र, भारतीय रिफायनरजीकडून बनवण्यात आलेल्या रिफाइंड उत्पादनांची खरेदी करतात, असे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR