33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभारतीय सैन्याची मालदीवमधून माघारीस सुरूवात

भारतीय सैन्याची मालदीवमधून माघारीस सुरूवात

आतापर्यंत २५ जवानांनी देश सोडला भारतीय सेना साध्या वेशातही थांबणार नाही

माले : भारताने मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सैन्याला बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. मालदीवच्या मिहारू वृत्तपत्रानुसार, अड्डू बेटावर उपस्थित असलेले २५ भारतीय सैनिक आतापर्यंत देश सोडून गेले आहेत. मिहारू यांनी त्यांच्या अहवालात दावा केला आहे की, मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाने त्यांना याबाबत माहिती दिली आहे.

मात्र, भारत किंवा मालदीवकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याआधी २९ मे रोजी मालदीवमध्ये भारतीय सैनिकांची जागा घेण्यासाठी २६ तांत्रिक कर्मचा-यांची पहिली तुकडी मालदीवमध्ये पोहोचली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माहिती दिली होती की, भारत आणि मालदीव यांच्यातील करारानुसार भारतीय सैनिक १० मे पर्यंत देशात परततील. मालदीवमध्ये सध्या असलेल्या भारतीय हेलिकॉप्टरचे नियंत्रण मालदीव लष्कराकडे असेल, अशी घोषणा एमएनडीएफने काही दिवसांपूर्वी केली होती. हेलिकॉप्टर चालवणारे क्रू देखील मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली काम करतील. तर राष्ट्राध्यक्ष मुइज्जू म्हणाले होते की, १० मे नंतर मालदीवमध्ये एकही भारतीय सैनिक राहणार नाही.

देशात अफवा पसरविण्याचे काम
राष्ट्रपतींच्या म्हणण्यानुसार, काही लोक देशात अफवा पसरवत आहेत की भारतीय सैनिक देश सोडत नाहीत, ते फक्त गणवेश बदलत आहेत आणि तांत्रिक कर्मचा-यांच्या बहाण्याने साध्या कपड्यात परतत आहेत. या अफवांचे खंडन करताना मुइज्जू म्हणाले भारतीय सैनिक गणवेशात किंवा साध्या कपड्यांमध्येही देशात राहणार नाहीत. हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो.

मालदीवमध्ये भारतीय सैनिक काय करतायेत?
मालदीवमध्ये सुमारे ८८ भारतीय सैनिक आहेत. ते दोन हेलिकॉप्टर आणि एका विमानाचे ऑपरेशन हाताळतात. सामान्यत: ते बचाव किंवा सरकारी कामात वापरले जातात. भारतीय हेलिकॉप्टर आणि विमाने मालदीवमधील मानवतावादी मदत आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तेथील लोकांना मदत करत आहेत. ही कामे हाताळण्यासाठी फक्त तांत्रिक कर्मचारी पाठवण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR