38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषधूम स्वयंचलित वाहनांची

धूम स्वयंचलित वाहनांची

बाईक आणि मोटार तंत्रज्ञानात होणारे बदल आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अनुभूती देतात. आता वाहनविश्वात विज्ञान अणि तंत्रज्ञानाचा नवा बदल सेल्फ ड्रायव्हिंग मोटारीच्या रूपातून पहावयास मिळत आहे. आगामी काळात स्वयंचलित तंत्राने धावणा-या गाड्या या मानवाचा प्रवास हा अधिकाधिक सुरक्षित करण्याबरोबरच सुलभ आणि स्वस्त करतील. या गाड्यांमुळे वाहन चालविण्याचा ताणही कमी राहणार आहे. संपूर्णपणे स्वयंचलित वाहनातून प्रवास करणारा व्यक्ती हा वाचलेला वेळ अन्य कामाला देऊ शकतो. अचूक तर्कावर धावणा-या गाड्या इंधनात ब-यापैकी बचत करतील. दिव्यांग व्यक्तीबरोबरच महिला आणि ज्येष्ठांसाठी देखील या गाड्या उपयुक्त मानल्या जात आहेत.

णसाचा मेंदू हा प्रत्येक वेळी आपले आयुष्य सुस कसे राहील याचा विचार करतो आणि त्यानुसार कृती करतो. आयुष्याच्या वाटचालीत स्कूटरपासून मोटारीपर्यंतची वाहने महत्त्वाची भूमिका बजावतात. लहानपणी आजोबांची स्कूटर आणि नंतर वडिलांची मारुती ८०० च्या आठवणी सर्वांनाच भारावून टाकणा-या असतात. बाईक आणि मोटार तंत्रज्ञानात होणारे बदल आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अनुभूती देतात. गेल्या काही दशकांपर्यंत वाहनांतील तांत्रिक बदल हे गिअर, हेडलाईट, इंटेरियर, एक्सेटियरपर्यंत मर्यादित असायचे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या ठिकाणी वीज आणि सीएनजीवर धावणा-या गाड्या उपलब्ध होत असून ते आपले जीवनमान पर्यावरण अनुकूल करत आहेत. इलेक्ट्रिक वाहने ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनामध्ये घट करण्याबरोबरच रस्ते अपघात आणि ध्वनिप्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता वाहनांच्या विश्वात विज्ञान अणि तंत्रज्ञानाचा नवा बदल सेल्फ ड्रायव्हिंग मोटारीच्या रूपातून पहावयास मिळत आहे.

तंत्रज्ञान आणि वाहन कंपन्या यांच्यात सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञानावरून स्पर्धा असल्याच्या बातम्या भविष्यातील वैशिष्ट्यपूर्ण मोटारीबाबत कुतुहल निर्माण करणा-या आहेत. आगामी काळात स्वयंचलित तंत्राने धावणा-या गाड्या या मानवाचा प्रवास हा अधिकाधिक सुरक्षित करण्याबरोबरच सुलभ आणि स्वस्तात करतील, असे वाटू लागले आहे. आजच्या काळात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. मात्र ही नवी तंत्रज्ञानयुक्त वाहने नव्या पिढीला दिलासा देतील. या गाड्यांमुळे वाहन चालविण्याचा ताणही कमी राहणार आहे. संपूर्णपणे स्वयंचलित वाहनातून प्रवास करणारा व्यक्ती हा वाचलेला वेळ अन्य कामाला देऊ शकतो. अचूक तर्कावर धावणा-या गाड्या इंधनात ब-यापैकी बचत करतील. दिव्यांग व्यक्तीबरोबरच महिला आणि ज्येष्ठांसाठी देखील या गाड्या उपयुक्त मानल्या जात आहेत.

सेल्फ ड्रायव्हिंग मोटार म्हणजे चमत्कारच
चालकाऐवजी मशिन तंत्रज्ञानाने धावणा-या गाड्या या चमत्कारापेक्षा वेगळ्या नाहीत. काही दशकांपूर्वी चालकाविना धावणा-या गाड्या चित्रपट आणि फिक्शनमध्ये दिसायच्या. पण चालकाविना मोटारीचा इतिहास हा बराच जुना आहे. १४७८ मध्ये लियोनार्दो दा विंची यांनी स्वयंचलित मोटारीचा पहिला प्रारूप आराखडा तयार केला होता. दा विंची यांनी स्प्रिंग्जवर आधारित एक स्वयंचलित रोबोच्या रूपातून वाहनाचे सादरीकरण केले होते. अमेरिकेसह युरोपीय देशांच्या दिग्गज कंपन्या ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या फीचरयुक्त वाहने बाजारात आणत आहेत. ऑटोमोबाईल कंपन्यांबरोबरच टेस्ला, अमेझॉन, गुगल, उबरसारख्या तंत्रज्ञान कंपन्या या चालकाविना असलेल्या गाड्यांच्या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
आजघडीला जगभरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सेल्फ ड्रायव्हिंग मोटार असून नसल्यासारखी आहे. मात्र अमेरिकी राज्य नेवादा हे सार्वजनिक वाहतुकीत वाहकाविना गाड्यांचा समावेश करणारे पहिले राज्य ठरले आहे. अमेरिकेतील अन्य राज्ये जसे कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, ओहियो, वॉशिंग्टन डीसीमध्ये चालकविना गाड्यांची वर्दळ वाढली आहे. या मोटारीत उच्च प्रतीचे ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम असते. ते वेगवेगळ्या माध्यमातून मिळणा-या डेटाचे संकलन करत त्याचे एआय आणि मशिन लर्निंग अल्गोरिदमच्या माध्यमातून विश्लेषण करत असते. डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून मिळणा-या रिअल टाईम इनपुटच्या आधारावर गिअर, अ‍ॅक्सिलेटर, ब्रेकसह सर्व भागांना सूचना दिली जाते. एआय मशिन लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम हे संयुक्तपणे मोटारीस स्वयंचलितरीत्या वहन करण्यासाठी प्रोत्साहित करते.

मोटारीचे तीन इंद्रिय कॅमेरा, रडार आणि लिडार
चालकाविना धावणा-या मोटारीत तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रडार सेन्सर, कॅमेरा आणि लिडार (लाईट डिटेक्शन अँड रेजिंग) यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. अर्धा डझनपेक्षा अधिक कॅमे-याच्या मदतीने व्हिज्युअल रिकॉग्निझन (छायाचित्रांच्या आधारे आकलन) करण्यात येते. या कॅमे-यांना मोटारीचे डोळेदेखील म्हटले जाते. पुढे आणि मागे बसविलेले रडार सेन्सर हे समोर दिसणा-या वस्तूंच्या गतींचे विश्लेषण करत असते. रडार आणि लिडार हे एआय सॉफ्टवेअरच्या माध्यमांतून एकमेकांना जोडलेले असतात. मोटारीवर बसविलेले लिडार हे मोटारीच्या चारही बाजूंवर निश्चित केलेल्या रेंजपर्यंत देखरेख करतात. हे उपकरण मोटारीच्या सॉफ्टवेअरला गाडीच्या आसपास असलेल्या वस्तूंचा थ्री डी मॅप पाठवत असतो. रडार सेन्सर हे ध्वनीलहरींचे विश्लेषण करतात तर लिडार हे दर सेंकदाला लाखो प्रकाशलहरींचे विश्लेषण करतात. ते ३६० अंशापर्यंत आपल्या परिसरातील वस्तूंचे आकलन करण्यास सक्षम असते. कॅमेरा, रडार आणि लिडार हे ऑटोमेटिक ड्रायव्हिंग सिस्टम तयार करतात. त्यामुळे परिसरातील गोष्टींवर लक्ष ठेवले जाते. मोटारींस मिळणा-या सूचनांनुसार डिजिटल मॅपिंग करत गाडी वाटचाल करते. ड्रायव्हिंग असिस्टंट सॉफ्टवेअरच्या मदतीने धावणारी मोटार नेव्हिगेशन सिस्टिमचा वापर करते. रस्त्यालगतची झाडे, बंगले, उड्डाणपूल, फुटपाथ याचे डिजिटल मॅपिंग कितपत अचूक करते यावर सेल्फ ड्रायव्हिंग मोटारीचा दर्जा अवलंबून असतो.

सेल्फ ड्रायव्हिंग मोटारीची उपयुक्तता वाढली
विशेष बाब म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग मोटारीला गरजेनुसार ऑटो आणि मॅन्युअल मोडवर टाकता येते. या मोटारीतून प्रवास करणारा व्यक्ती हा एक डेस्टिनेशन निश्चित करतो. मोटारीचे सॉफ्टवेअर इच्छित स्थळी जाण्यासाठी रस्त्याचे आकलन करते. मोटारीतील सॉफ्टवेअर ड्रायव्हिंग कंट्रोल सिस्टिम आणि प्रवासी यांच्यात कम्युनिकेशन ठेवण्याचे काम करते. मॉनिटरच्या माध्यमातून प्रवासी हा मोटारीच्या ड्रायव्हिंग कंट्रोल सिस्टिमला सूचना देऊ शकतो. या मेन्यूत मॅप व् ू आणि म्यूझिकसह अनेक फीचर असतात. रायडर सपोर्ट सिस्टिममध्ये मायक्रोफोनही असतो. यामुळे मोटार आणि प्रवासी याच्यातील संवाद हा सोपा करतो. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि व्हॉईस रिंकॉग्निजन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मशिन अणि मनुष्य यांच्यातील सूचनांचे आदानप्रदान सुलभ करण्यात आले आहे.स्वयंचलित मोटार ही एआयसाठी वरदान ठरत आहे. एआय टूल हे रस्त्यावर धावणा-या गाड्यांचे आणि वाहनांचे अंदाज शोधण्यात मदत करतात. सेल्फ ड्रायव्हिंग मोटारीतील अ‍ॅडॉप्टिव्ह क्रुझ कंट्रोल (एसीसी) मुळे समोर असणा-या वाहनांचे आणि वस्तू यांच्यात अंतर निश्चित करण्यात मदत मिळते. उदा. ऑटोमेटेड लेन सेंटरिंग वाहनाला निश्चित केलेल्या लेनवर कायम ठेवण्यात मदत मिळते. याप्रमाणे फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग सिस्टिम हे समोरून येणा-या वस्तूंपासून आपल्या वाहनांना सुरक्षित ठेवण्याचे काम करते. ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सिस्टिम हे रस्त्यांवरच्या स्थितीचे आकलन करून वाहन चालविण्यात मदत करते.

खर्च कमी करण्याचा प्रयत्न
चालकाविना धावणा-या गाड्यांचा विकास हा अनेक टप्प्यांतून आणि चमत्कारांतून होत आहे. सेमी ऑटोमेशन फीचरयुक्त मोटार ही चालकाला अ‍ॅक्सिलेटर, ब्रेक, स्टेअरिंगवर नियंत्रण ठेवण्याची सूचना देतो. आज बाजारात दाखल होणा-या अनेक मोटारीत या सुविधा पाहावयास मिळतात. यात तंत्रज्ञानयुक्त चालकाला गाडी चालविण्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत केली जाते. गुगलने २००९ मध्ये सेल्फ ड्रायव्हिंग मोटारीचा प्रोजेक्ट सुरू केला. यात एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक खर्च करण्यात आला. सध्याच्या काळात ‘वेमो’ नावाने हा प्रोजेक्ट सुरू आहे. या योजनेत तयार झालेल्या सेल्फ ड्रायव्हिंग मोटार रस्त्यावर धावत आहे. अर्थात या गाडीचा खर्च अजूनही ८० लाख रुपये आहे.

या मोटारीचा खर्च कमी करावा लागेल. सेल्फ ड्रायव्हिंग मोटारीत तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता आणखी सक्षम करावी लागेल. संगणक शास्त्रज्ञांसह आधुनिक तंत्रज्ञानावर काम करणा-या शास्त्रज्ञांसाठी हे एक मोठे आव्हान आहे. स्वयंचलित मोटारीच्या विकासात आणि चाचणीमध्ये ऑडी, बीएमडब्ल्यू, फोर्ड, गुगल, जनरल मोटर्स, टेस्ला, फोक्सवॅगन यासारख्या मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे. आजही बहुतांश वाहने आणि टेक कंपन्यांचे स्वयंचलित वाहनांचे तंत्रज्ञान प्राथमिक रूपात आहे. बंगळुरूमधील स्टार्टअप मायनस झीरो या कंपनीने देशातील पहिल्या सेल्फ ड्रायव्हिंग मोटार ‘जेडपॉड’चा प्रारूप आराखडा तयार केला. यात चालक नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे एआयवर आधारित आहे. हे वाहन सध्या निवासी भागाजवळ काही अंतरापर्यंतच जाण्यास सक्षम आहे.

सॉफ्टवेअर हॅकिंगचा धोका
ऑटोमोडवर धावणा-या गाड्यांची सर्वांत मोठी अडचण म्हणजे हॅकिंगचा धोका. आकाश निरभ्र असेल तरच गाडीचे सेन्सर हे चांगल्या रीतीने काम करेल आणि परिसरातील वस्तूंचे आकलन करेल. पाऊस, धुके, हिमवृष्टी या गोष्टींचा फटका बसू शकतो. चीन देखील स्वयंचलित वाहनांना व्यावहारिक पातळीवर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. चीनमध्ये तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबरच त्यांचा वेगळा मार्ग आणि पायाभूत सुविधा देखील विकसित केल्या जात आहेत.

चालक नसेल तर कोणाला शिक्षा
अमेरिकी वाहतूक विभागाच्या एका अहवालानुसार ९० टक्के अपघातांमागे मानवी चूक कारणीभूत असते. मद्यपान करून गाडी चालविण्यावर बंदी असली तरी मोठ्या प्रमाणात चालक मद्यपान करूनच गाडी चालवतात. अशावेळी सेल्फ ड्रायव्हिंग मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यास सा भूत ठरेल. चालकविरहित गाड्या उच्च तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधाजनक असल्या तरी त्या काहीवेळा कायदेशीर अडचणी देखील निर्माण करणा-या आहेत. एखाद्या वेळी एआययुक्त मोटारीने अपघात झाला तर कायदेशीर कारवाई कोणावर होणार? भरपाई आणि विमासारखी प्रकरणे कशी निकाली काढली जातील?

अमेरिकेत विमा कंपन्यांनी अशा प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पॅनेलमधून मिळणा-या तथ्यांना जबाबदार धरले आहे. अमेरिकेत १४०० स्वयंचलित वाहने सध्या रस्त्यावर आहेत. व्हॉल्वोसह अनेक दिग्गज मोटार कंपन्या या त्यांच्या स्वयंचलित वाहनांकडून झालेल्या अपघाताच्या स्थितीत स्वत: भरपाई देण्याची हमी देत आहेत. स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत असताना यासाठी वेगळे कायदे आणावे लागतील. अमेरिकेतील ऑस्टिन येथे एका स्वयंचलित वाहनाने झालेल्या अपघाताच्या खटल्याच्या सुनावणीत ट्रकमधील इलेक्ट्रॉनिक रेकार्डिंग सिस्टिममध्ये सापडलेल्या तथ्यांना पुरावे म्हणून गृहित धरले गेले. अमेरिकी राज्य टेक्सासमध्ये एक कायदा तयार केला असून त्यानुसार स्वयंचलित वाहनांत व्हीडीओ रेकॉर्डिंग उपकरण बसविणे बंधनकारक आहे. यानुसार अपघाताची वाहन कंपनीसह सूचना देणारा व्यक्ती, सॉफ्टवेअर कंपनी, उपकरण कंपनीवर जबाबदारी निश्चित केली जात आहे.

– अरविंद कुमार मिश्रा, ऊर्जातज्ज्ञ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR