मतदारयादी सुधारणा आमचा विशेषाधिकार

सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप नको, निवडणूक आयोगाचे शपथपत्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. त्यात देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे. असे असतानाही न्यायालयाने त्यासंबंधी निर्देश दिले तर ते अधिकारांमध्ये हस्तक्षेप ठरेल, असे म्हटले. संविधानाच्या कलम ३२४ नुसार मतदार यादी तयार करणे आणि त्यात वेळोवेळी बदल करणे हा फक्त निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. हे काम इतर कोणत्याही संस्थेला किंवा न्यायालयाला देता येणार नाही, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

आम्ही आमची जबाबदारी समजतो आणि मतदार यादी पारदर्शक ठेवण्यासाठी सतत काम करतो, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हे शपथपत्र अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर दाखल करण्यात आले. या याचिकेत निवडणूक आयोगाला भारतात, विशेषत: निवडणुकीपूर्वी एसआयआर करण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून देशाचे राजकारण आणि धोरण केवळ भारतीय नागरिकच ठरवू शकतील. ५ जुलै २०२५ रोजी निवडणूक आयोगाने बिहार वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना (सीईओ) पत्र पाठवून १ जानेवारी २०२६ या पात्रता तारखेच्या आधारे एसआयआरची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले.
कलम २१ नुसार मतदार यादीत बदल करण्यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही. उलट ही एक सामान्य जबाबदारी आहे, जी प्रत्येक सार्वत्रिक निवडणूक, विधानसभा निवडणूक किंवा जागा रिक्त असताना होणा-या पोटनिवडणुकीपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. नियम २५ मधून हे स्पष्ट होते की, मतदार यादीत किरकोळ किंवा मोठे बदल करायचे की नाही, ते पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

मतदार यादीबाबत
पुनरावृत्तीचे स्वातंत्र्य
मतदार यादी योग्य आणि विश्वासार्ह ठेवणे ही निवडणूक आयोगाची कायदेशीर जबाबदारी आहे. म्हणून लोकप्रतिनिधी कायदा, १९५० अंतर्गत २४ जून २०२५ च्या एसआयआर आदेशानुसार वेगवेगळ््या राज्यांत एसआयआर करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० आणि मतदार नोंदणी नियम १९६० नुसार आयोगाला संक्षिप्त पुनरावृत्ती कधी करायची आणि सघन पुनरावृत्ती कधी करायची हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही निवडणूक आयोगाने शपथपत्रात म्हटले आहे.

आधार ओळखीचा पुरावा
म्हणून विचारात घ्यावा
८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून अनिवार्यपणे समाविष्ट करावे. निवडणूक आयोगाला ९ सप्टेंबरपर्यंत या सूचना लागू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि, न्यायालयाने आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्यामुळे आधार क्रमांकाची सत्यता तपासू शकता, असे म्हटले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53

Latest news