33.5 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeलातूरमोदीजी...यह बात कुछ हजम नही हुई

मोदीजी…यह बात कुछ हजम नही हुई

अल्पशिक्षित उमेदवाराच्या जोरावर शैक्षणिक नगरी राज्याचे विकसित केंद्र कशी बनेल?

लातूर : विनोद उगीले
सोमवारी लातूरात भाजपाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या जन आशीर्वाद सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरचा शैक्षणिक नगरी असा उल्लेख करीत ही शैक्षणिक नगरी महाराष्ट्र राज्याचे विकसित केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त करून यासाठी अल्पशिक्षित व वकृत्वाचा अभाव असलेल्या सुधाकर शृंगारे यांना विजयी करण्याचे आवाहन केले खरे पण मोदींची यह बात लातूरकरांना काहीशी हजम झालेली नाही.

मितभाषी, वकृत्वाचा अभाव असलेल्या अल्पशिक्षित सुधाकर शृंगारे यांना मागच्या २०१९ च्या मोदी लाटेत लातूरकरांनी मोदींवर विश्वास ठेवत सुधाकर शृंगारे यांना मोठ्या मतरधिक्याने विजयी करून खासदार म्हणून संसदेत पाठवले. मागच्या पाच वर्षात सुधाकर शृंगारे हे वकृत्वाच्या अभावी लातूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासात्मक बाबतीत त्यांनी ठासून संसदेत प्रश्न उपस्थित करून ते सोडवून घेतले नाहीत. ते आजही दुस-यांदा निवडणूकीला सामोरे जाताना मी हे हे प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडून ते सोडवून घेतले असे खासदार सुधाकर शृंगारे व त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे नेते मंडळी ही सांगत नाहीत. केवळ मोदींचे नाव पुढे करून जनेतेला मतदान मागीतले जात आहेत.

ही बाब सर्वसामान्य मतदारांच्या लक्षात आली आहे. असे असतानाच सोमवारी लातूरात भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली या सभेत त्यांनी त्यांची ताकद वाढवण्यासाठी व शैक्षनिक नगरी लातूरला महाराष्ट्र राज्याचे विकसित केंद्र बनवण्यासाठी सुधाकर शृंगारे यांना परत एकदा विजयी करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राचे जाऊ द्या, या शैक्षणिक नगरीला विकसित करण्यासाठी त्यांचे साथीदार खासदार सुधाकर शृंगारे यांनी संसदेत कसे प्रभावी काम केले याचा एकदा ही उल्लेख केला नाही. नेमकी ही मोदींची बात लातूर लोकसभा मतदार संघातील जनतेला हजम झाली नाही. अल्पशिक्षित व वकृत्वाचा अभाव असलेले सुधाकर शृंगारे शैक्षणिक नगरी लातूरला महाराष्ट्र राज्याचे विकासाचे केंद्र कसे बनवतील असा सवाल ही लातूर करांतून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR