महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. सक्तीच्या धर्मातरणावर आता कठोर शिक्षा केली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य सरकारकडे अधिसूचना जारी करण्यासाठी हे विधेयक पाठवले आहे. आता हा कायदा कधीपासून लागू करण्यात येईल याची तारीख ठरवण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल.

महाराष्ट्र विधानसभेत मार्च २०२६ मध्ये अर्थसंकल्प अधिवेशनात हे विधेयक पारित करण्यात आले होते. त्यानंतर विधान परिषदेतही याला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर विधेयक राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्या स्वीकृतीसाठी पाठवण्यात आले होते. राष्ट्रपती यांची मंजुरी मिळाल्यानंतर आता फक्त राज्य सरकार अधिसूचना कधी जारी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ चा मुख्य उद्देश हा बळजबरीने, फसवणूक करून, दिशाभूल व आमिष दाखवून लग्नाचे वचन देऊन करण्यात येणा-या धर्मांतरणावर आळा घालणे हा आहे. कायद्यात अनेक महत्त्वाच्या तुटी दाखल केल्या आहेत.

कुणाला स्वेच्छेने धर्मांतरण करायचे असल्यास ६० दिवस आधी तसा अर्ज सक्षम प्राधिकरणाकडे करावा लागणार. तसेच, एखाद्या व्यक्तीचे धर्मांतर बळजबरी, धोक्याने किंवा लग्नाचे वचन देऊन करत असतील तर तो दखलपात्र गुन्हा आहे.

धर्मपरिवर्तन करणा-या व्यक्ती व संस्थेवर हे सिद्ध करण्याची जबाबदारी असेल की धर्मपरिवर्तन हे स्वच्छेने झाले आहे का. धर्म परिवर्तनाबाबत आई-वडील, भाऊ-बहीण आणि अन्य जवळचे नातेवाईक तक्रार दाखल करू शकणार आहेत. कायद्याचे उल्लंघन झाल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच, जर पुन्हा गुन्हा घडला तर १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच, आंतरधर्मीय विवाह झाल्यास अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा धर्म लागू होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58

Latest news