रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून २ लाखांचा दंड वसूल

परभणी : दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड वाणिज्य विभागामार्फत दि. ३१ जुलै रोजी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या आभियानात एकूण ३३९ विनातिकीट व अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळून आली. या कारवाईत रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून २ लाख ३३ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या तिकीट तपासणी मोहिमेमुळे फुकट्या रेल्वे प्रवाशांचे धाबे दणाणले असून त्यांनी या कारवाईचा धसका घेतला आहे. तिकीट काढून प्रवास करणा-या प्रवाशांना विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांचा त्रास होऊ नये यादृष्टीकोनातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या आभियानात सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात विभागातील २४ गाड्यांची तपासणी करण्यात आली. या अभियानात २८ तिकीट तपासणी कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी सहभागी झाले. सर्व तिकीट तपासणी पथकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. या कारवाईत विनातिकीट प्रवास २२६ प्रकरणातून २ लाख ६८५ रूपये, अनियमित प्रवासाच्या २९ प्रकरणातून १५ हजार ८१५ रूपये आणि बुक न केलेले सामानाच्या ९३ प्रकरणातून १६ हजार ८०० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला.

हे अभियान नांदेड विभागाच्या वैध तिकीटधारक प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास उपलब्ध करून देणे, रेल्वे महसुलाचे संरक्षण करणे आणि प्रवाशांमध्ये तिकीटासह प्रवासाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने राबविण्यात आले. प्रवाशांनी वैध तिकीट किंवा योग्य प्रवास प्राधिकरणासहच प्रवास करावा. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे महसुलाच्या संरक्षणासाठी अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा भविष्यातही नियमितपणे राबविण्यात येतील, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
वर्धापन दिन । पुरोगामी विचाराचे एकमत
02:39:31
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41

Latest news