लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत शहरातील प्रमुख ८४ नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. जवळपास ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. लातूर शहरातील साळूंके नगर खाडगाव रिंग रोड, छत्रपती शाहू महाराज चौक येथील मान्सूनपूर्व नालेसफाईची कामाची महापौर जयश्रीताई सोनकांबळे, नगरसेवक अॅड. फारूख शेख यांनी पाहणी केली.पावसाळ्यात कोठेही पाणी साचणार नाही व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही याची दक्षता घेण्यास निर्देश केले. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी कलिम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक धोंडीराम सोनवणे, शिवराज शिंदे, अक्रम शेख, स्वच्छता निरीक्षक शिवाजी कुटकर, प्रदिप गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते.
















