मुंबईत रेड अलर्ट!

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत अतिवृष्टीसह ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या इशा-यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांनी शक्य असेल तेथे कर्मचा-यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा द्यावी, असे सांगण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांतील कर्मचा-यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत होणारी गर्दी कमी होऊन कर्मचा-यांना सुरक्षितपणे घरी पोहोचता यावे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुंबईत सकाळपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी पाणी साचणे, झाडे पडणे आणि वाहतुकीचा वेग मंदावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने विशेषत: समुद्रकिनारी जाणे टाळावे, अनावश्यक प्रवास करू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा, असेही नागरिकांना सांगितले आहे. परिस्थितीवर मुंबई महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि इतर संबंधित यंत्रणा सातत्याने लक्ष ठेवून आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
00:00
Video thumbnail
Latur|उपवर्गीकरणाविरोधात ५८ जाती एकवटल्या; लातूरमध्ये ऐतिहासिक मोर्चा
02:01
Video thumbnail
Latur|रेणापूर तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे आंदोलन
01:25
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
02:41
Video thumbnail
Latur|फुटबॉलसाठी लातूर सज्ज... सुरू झाली आंतरराष्ट्रीय मैदानांची उभारणी!
03:59
Video thumbnail
LIVE-लातुरात आज आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार!
06:53
Video thumbnail
Latur|शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही; न्यायासाठी आमरण उपोषण
01:51
Video thumbnail
Latur|लातुरात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आज महामोर्चा!
03:36
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये उबाठाचे रामरक्षा आंदोलन; दानप्रकरणावर संताप
02:44
Video thumbnail
Nanded|रेल्वे गाड्यांच्या उद्घाटनापूर्वी उबाठा पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटिसा
01:10
Video thumbnail
'मिसिंग लिंक'वर पावसाचा फटका; दरड कोसळल्यानंतर ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
00:41
Video thumbnail
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने केली तिसरी लग्नगाठ; गौरी स्प्रॅटसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल.
00:48
Video thumbnail
Hatta News|हट्टाकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!;२.४० कोटींच्या नव्या बसस्थानकाचे भूमिपूजन
07:13
Video thumbnail
Latur Police Action|लातूर पोलिसांची धडाकेबाज ॲक्शन; आरोपींची गंजगोलाईत धिंड
02:08
Video thumbnail
Latur|जिल्हा परिषदेत पहिली वार्षिक सभा; राजकीय हालचालींना वेग
04:26

Latest news