Homeअंतरराष्ट्रीययुक्रेन-रशिया युद्धाला भारत जबाबदार नाही; भारत-अमेरिका संबंध रिसेट करण्याची वेळ

युक्रेन-रशिया युद्धाला भारत जबाबदार नाही; भारत-अमेरिका संबंध रिसेट करण्याची वेळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या निर्णयावर टीका करणा-या अमेरिकन अधिका-यांना एका प्रभावी अमेरिकन ज्यू वकिली गटाने चांगलेच फटकारले आहे. अमेरिकन ज्यू कमिटीने स्पष्ट केले आहे की, रशिया-युक्रेन युद्धासाठी भारत जबाबदार नाही आणि भारत-अमेरिका संबंध ‘रीसेट’ करण्याची वेळ आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासनातील काही माजी अधिकारी भारताच्या रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणावर टीका करत आहेत. भारताच्या या निर्णयामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या ‘युद्धतंत्रा’ला आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हाईट हाऊसचे माजी व्यापार सल्लागार पीटर नॅव्हारो यांनी तर याला ‘मोदींचे युद्ध’ संबोधून शांततेचा मार्ग नवी दिल्लीतून जातो, असे वादग्रस्त विधान केले होते.

या टीकेला उत्तर देताना अमेरिकन ज्यू कमिटीने म्हटले आहे की, अमेरिकन अधिका-­यांकडून भारतावर होत असलेल्या टीकेमुळे आम्ही चकित आणि चिंतित आहोत. नॅव्हारो यांच्या विधानाला निराधार आरोप ठरवत समितीने पुढे म्हटले की, ऊर्जेची गरज असलेल्या भारताचे रशियन तेलावरील अवलंबित्व खेदजनक आहे; पण पुतीन यांच्या युद्ध गुन्ह्यांसाठी भारत जबाबदार नाही. भारत एक सहकारी लोकशाही देश आणि अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे. दोन्ही देशांमधील संबंध नव्याने प्रस्थापित करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR