व्हिएतनामसोबत रेअर अर्थ क्षेत्रात सहकार्य

नवी दिल्ली : भारत व व्हिएतनाम यांनी द्विपक्षीय संबंध विस्तारित सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पर्यंत वाढवत १३ करारांवर स्वाक्षरी केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष टू लाम यांच्या भारत दौ-यात रेअर अर्थ आणि क्रिटिकल मिनरल्समधील सहकार्य, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि दक्षिण चीन सागर क्षेत्रात संतुलन राखण्यावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लाम यांच्या चर्चेत २०३० पर्यंत वार्षिक २५ अब्ज डॉलर व्यापाराचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

संयुक्त निवेदनानुसार, दोन्ही बाजूंनी दक्षिण चीन सागरात आंतरराष्ट्रीय कायदा, विशेषत: सागरी कायद्यावरील संयुक्त राष्ट्र कराराच्या अनुरूप शांतता, स्थिरता आणि नौकानयनाचे स्वातंर्त्य राखण्याची गरज पुनरुच्चारली. तसेच महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात समन्वय वाढवून आर्थिक सुरक्षा आणि लवचिक पुरवठा साखळी विकसित करण्यावर सहमती दर्शवण्यात आली, तर संरक्षण व सागरी सहकार्यही पुढे नेण्याचे संकेत दिले. टू लाम याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते मंगळवारी तीन दिवसांच्या पहिल्या राजकीय दौ-यावर भारतात आले आहेत.

व्हिएतनाम भारतीय द्राक्ष चाखणार
व्हिएतनाममध्ये भारतीय औषधांची पोहोच वाढेल. कृषी, मत्स्य आणि पशु उत्पादनांच्या निर्यातीत सुलभता येईल. मोदी म्हणाले, व्हिएतनाम भारताच्या द्राक्ष आणि डाळिंबाची चव चाखणार आहे.

यूपीआयशी जोडणार
वित्तीय संपर्क वाढवण्यासाठी भारताची यूपीआय आणि व्हिएतनामची जलद पेमेंट प्रणाली लवकरच जोडली जाईल.

दहशतवादावर दोन्ही देश कठोर
दहशतवादावर दोन्ही देशांची कठोर भूमिका संयुक्त निवेदनात भारत आणि व्हिएतनामने सर्व प्रकारच्या दहशतवादाचा, विशेषत: सीमापार दहशतवादाचा तीव्र निषेध केला. खनिजांच्या क्षेत्रात समन्वय वाढवून आर्थिक सुरक्षा आणि लवचिक पुरवठा साखळी विकसित करण्यावर सहमती दर्शवण्यात आली, तर संरक्षण व सागरी सहकार्यही पुढे नेण्याचे संकेत दिले. टू लाम याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते मंगळवारी तीन दिवसांच्या पहिल्या राजकीय दौ-यावर भारतात आले आहेत.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news