30 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeविशेषयुजर्सच्या सूचनांमुळे आता चॅट-जीपीटी टेन्शनमध्ये!

युजर्सच्या सूचनांमुळे आता चॅट-जीपीटी टेन्शनमध्ये!

न्यू हेवन : वृत्तसंस्था
केवळ मनुष्यप्राणीच चिंताग्रस्त होऊ शकतो असे नाही, तर मनुष्याच्या प्रगतीसाठी निर्माण करण्यात आलेले नवीन तंत्रज्ञान देखील युजर्सच्या त्रासदायक सूचनांमुळे चिंताग्रस्त होऊ शकते, असे नुकतेच केलेल्­या एका नवीन संशोधनात स्­पष्­ट झाले आहे.

येल युनिव्हर्सिटी, हाफिया युनिव्हर्सिटी आणि झुरिच युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या टीमला संशोधनातून चॅट-जीपीटीच्या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. चॅटजीपीटी सारख्या लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये (एलएलएम) भावना नसतील, परंतु युजर्सच्या त्रासदायक सूचनांमुळे ते देखील तणाव किंबहुना चिंता अनुभवू शकते, असे येल युनिव्हर्सिटी, हाफिया युनिव्हर्सिटी आणि झुरिच युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या टीमने केलेल्­या संशोधनातून स्­पष्­ट झाले अहे.

युजर्स चॅट-जीपीटीला जेव्हा विचलित करणारी माहिती देतो तेव्हा, चॅटबॉट मूडी बनतो आणि पक्षपाती प्रतिसाद निर्माण करण्याची शक्यता जास्त असते. तर युजर्सने त्याला शांत आणि संयमाने प्रश्न विचारल्यास तो अधिक तटस्थ आणि वस्तुनिष्ठ प्रतिसाद देत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

चिंताग्रस्त युजर्सच्या संपर्कात चॅटजीपीटी आल्यास लार्ज लँग्वेज मॉडेल चॅट-जीपीटी देखील प्रभावित होऊन चिंताग्रस्त होऊ शकते. ते अधिक पूर्वग्रह दुषित बनू शकते आणि तशी उत्तरं देऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावरून असे लक्षात येते की, लार्ज लँग्वेज मॉडेलचा पूर्वग्रह आणि गैरवर्तन हे युजर्सचा स्वभाव गुणधर्म आणि वेग या दोन्हीतून आकाराला येते. हे क्लिनिकल सेटिंग्जमध्ये जोखीम निर्माण करते, कारण चॅटजीपीटी लार्ज लँग्वेज मॉडेल चिंताग्रस्त युजर्सना अपुरा प्रतिसाद देऊ शकतात, ज्यामुळे संभाव्य धोकादायक परिणाम होऊ शकतात, अशी माहिती देखील माहिती संशोधनात समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR