सांगली : प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मोटेवाडी गावच्या हद्दीत वादळी वा-याने मोठी दुर्घटना घडली. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
जत तालुक्यातील मोटेवाडी गावच्या हद्दीत दुर्दैवी घटना घडली. वादळी वारा आणि पावसाने एका मंदिराच्या परिसरातील भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर काही भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जत मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
शंकर आबा लोखंडे पाडोझरी, मंगल भाऊसो मोठे पांडोजरी, संजूबाई राम चौधरी पांडोजरी, कोंडीबा गेजगे दरीबडची, अशी मृतांची नावे असून, आणखी दोन भाविकांची नावे समजू शकली नाहीत. एकूण सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

