रितेश देशमुख बनले ‘पितांबरी देवभक्ती’चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई : प्रतिनिधी
नैसर्गिक सुगंध आणि भक्तीचा अनोखा संगम घेऊन ‘पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’ आता देशभरातील ग्राहकांच्या भेटीला आली आहे. देशातील विश्वासार्ह ‘एफएमसीजी’ ब्रँड पितांबरीने राष्ट्रीय अगरबत्ती बाजारपेठेत प्रवेश करत या उत्पादनाच्या प्रचारासाठी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते रितेश विलासराव देशमुख यांची ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून निवड केली आहे.

नैसर्गिक तत्त्वांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलाचा सुगंध ही पितांबरी देवभक्ती अगरबत्तीची खासियत आहे. दीर्घकाळ टिकणारा नैसर्गिक सुगंध आणि कमी धूर यामुळे ही अगरबत्ती पूजेला अधिक शांत, सुखद आणि प्रसन्न बनवते. चंदन, मोगरा, गुलाब, चंपा अशा विविध नैसर्गिक सुगंधांमध्ये पितांबरी देवभक्ती अगरबत्ती उपलब्ध करण्यात आली आहे.

पितांबरी देवभक्ती अगरबत्ती भारतातील पहिली ‘मास-प्रोड्युस्ड’ नैसर्गिक सुगंधाची अगरबत्ती असून पितांबरीने ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन परंपरा, गुणवत्ता आणि नावीन्य जपण्याचा प्रयत्न या उत्पादनातून केला आहे.

देव आपल्या प्रत्येक क्षणी सोबत असतो, आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आशीर्वाद देतो, या भावनेवर या जाहिरातीची संकल्पना आधारित आहे. भारतीय घरांमध्ये प्रत्येक दिवसाची सुरुवात देवपूजा आणि ईश्वराच्या आशीर्वादाने होते. मग तो रिक्षाचालक असो, चहावाला, दुकानदार किंवा संपूर्ण कुटुंब, प्रत्येक जण नवीन आशा घेऊन देवाच्या प्रार्थनेने दिवसाची सुरुवात करतो. पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा नैसर्गिक सुगंध प्रत्येक प्रार्थनेला देवापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम बनतो. ईश्वराशी अधिक आत्मीयतेने जोडल्याची अनुभूती देतो आणि प्रत्येक प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवतो.

या जाहिरातीचा मुख्य संदेश ‘हा देश जागतो नव्या आशा आणि स्वप्नांसह’ हा असून ‘जिथे श्रद्धा आणि भक्ती, तिथे दरवळे पितांबरी देवभक्ती’ या समर्पक टॅगलाईनने जाहिरातीचा समारोप होतो. रितेश देशमुख यांची सहज, प्रभावी, आध्यात्मिक शैली आणि भावपूर्ण निवेदन या जाहिरातीत श्रद्धा आणि भक्तिभाव अधिक प्रभावीपणे अधोरेखित करते.

या जाहिरात मोहिमेची संकल्पना आणि दिग्दर्शन महेश लिमये यांच्या ली प्रॉडक्शन्सने आणि पितांबरी क्रिएटिव्ह टीमच्या सहकार्याने केले आहे. या उत्पादनाच्या देशव्यापी प्रचारासाठी टीव्ही, वृत्तपत्रे आणि सोशल मीडिया अशा विविध माध्यमांद्वारे ३६० डिग्री जाहिरात मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘पितांबरी’ विश्वासू, मराठमोळा ब्रँड : रितेश देशमुख
या जाहिरातीविषयी बोलताना रितेश देशमुख म्हणतात; ‘पितांबरी हा देशातील विश्वासू, मराठमोळा आणि परंपरा जपणारा ब्रँड आहे.’ ‘पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’ जाहिरातीच्या माध्यमातून मला भारतीय संस्कृतीतील श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्याची संधी मिळाली याचा अत्यंत आनंद आणि अभिमान आहे. पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचे नैसर्गिक सुगंध खरोखरच अप्रतिम असून ही अगरबत्ती प्रत्येक घरातील पूजेचा महत्त्वपूर्ण भाग बनेल असा विश्वास वाटतो.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01

Latest news