रेणापूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने केलेल्या घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ तसेच बाजारपेठेत निर्माण झालेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याविरोधात रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रशांत थोरात यांना निवेदन देण्यात आले.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. वारंवार होणा-या गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान अधिक कठीण होत असून वाढत्या महागाईमुळे नागरिक अगोदरच त्रस्त झाले आहेत. त्यातच बाजारपेठेत एलपीजी गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, बाजारपेठेत निर्माण झालेला तुटवडा दूर करावा आणि नागरिकांना गॅस सिलेंडर नियमित व सहज उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद कापसे, शहराध्यक्ष पदमसिंह पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अॅड. शेषराव हाके, संचालक प्रकाश सूर्यवंशी, विश्वनाथ कागले, हनुमंतराव पवार, नगरसेवक सचिन मोटेगावकर, गजेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य बालाजी गोटके, तात्याराव वाघमारे, उद्धव जाधव, संतोष शिंदे, दिलीप उरगुंडे, केशव माने, गोविंद पवार, सचिन इगे, विलास राठोड, कैलास चव्हाण, दिग्विजय पाटील, बाळासाहेब करमुडे, बिभीषण कदम, संजय कांदे, महेश गरड, अजय चक्रे, शंकर भुरे, एम. पी. पडोळे, ज्ञानेश्वर मडके, गोविंद वीर, चैतन्य देशमुख, आत्माराम शिंदे, सुरज वंगाटे, अवधूत कातळे, प्रवीण सोमवंशी, अमरेश भिसे, रघुनाथ मदने, गणेश पांचाळ, दयानंद करमुडे, दत्तात्रय डिगोळे, गणेश कलाल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
