Homeअंतरराष्ट्रीयभारतासह १६ देशांवर  नव्याने टॅरिफ लादणार?

भारतासह १६ देशांवर  नव्याने टॅरिफ लादणार?

व्यापारी भागिदारांविरोधात अमेरिकेची चौकशी
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारत आणि चीनसह त्यांच्या १६ प्रमुख व्यापारी भागीदारांविरुद्ध कलम ३१० अंतर्गत नवीन चौकशी सुरू केली आहे. कलम ३०१ अमेरिकेला त्यांच्या कंपन्यांना नुकसान पोहोचवणा-या देशांवर एकतर्फी कर वाढविण्याचा अधिकार देते. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे शुल्क बेकायदेशीर घोषित केल्यानंतर प्रशासन आता नवीन कायदेशीर मार्गांनी शुल्क लावण्याची तयारी करीत आहे.
यूएस ट्रेड रिप्रझेंटेटिव्ह जेमसन ग्रीर यांच्या मते या चौकशीमुळे या उन्हाळ््यापर्यंत भारत, चीन, युरोपियन युनियन आणि मेक्सिकोसारख्या देशांवर नवीन शुल्क लादले जाऊ शकते. ट्रम्प प्रशासनाने एकूण १६ व्यापारी भागीदारांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. यामध्ये भारत, चीन, युरोपियन युनियन, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, व्हिएतनाम, तैवान, थायलंड, मलेशिया, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बांगलादेश, स्वित्झर्लंड आणि नॉर्वे या देशांचा समावेश आहे.
२० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी लादलेल्या जागतिक करांना बेकायदेशीर घोषित केले. त्यानंतर ट्रम्प यांनी १५० दिवसांसाठी तात्पुरते १० टक्के कर लादले. आता व्यापारी भागीदारांवर कर लावण्याचा धोका कायम ठेवण्यासाठी आणि त्यांना वाटाघाटीच्या टेबलावर आणण्यासाठी कलम ३०१ चा वापर करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR