लातूर : प्रतिनिधी
लातूर ऑप्टिकल असोसिएशनच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने दणदणीत विजय संपादन करत असोसिएशनमध्ये नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. या विजयामुळे लातूर शहरातील ऑप्टिकल व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लातूर ऑप्टिकल असोसिएशनची निवडणूक दि. २५ ऑक्टोबर रोजी झाली. निवडणूक प्रमुख प्रविण पांपटवार, प्रशांत रब्बेवर, संजय शिंगारे आणि अतुल सेलमोकर यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या अध्यक्षपदी माधव शिंदे, उपाध्यक्ष प्रसनजीत जोगदंड, सचिव संतोष यादव , सहसचिव किरण हिंगमिरे, कोषाध्यक्ष समीर अनंतवार तर सहकोषाध्यक्षपदी सुमीत हुळमजगे यांची निवड झाली. परिवर्तन पॅनेलचे प्रमुख विलास आवडोबा (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली या पॅनेलने निवडणूक लढवली. परिवर्तन पॅनेलच्या या विजयामुळे लातूर ऑप्टिकल असोसिएशनमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय झाला असून, संघटनेच्या वाटचालीला नवी दिशा मिळण्याची आशा सभासदांमध्ये निर्माण झाली आहे.
















