दुष्काळग्रस्तांना आता वाढीव मदत मिळणार?

निकष बदलले, जिरायतीसाठी हेक्टरी ११ हजार मिळणार
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळग्रस्त आणि नैसगिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत (एनडीआरएफ) दिल्या जाणा-या आर्थिक मदतीच्या निकषात सुधारणा केली आहे. आता नव्या निकषानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ११ हजार रुपये, बागायतीसाठी २२ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी ३० हजार रुपये मदत मिळणार आहे. परंतु यासाठी राज्य सरकारने यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी लागणार आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणारी मदतही ४ लाखांवरून ८ लाख रुपये करण्यात आली आहे. अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणा-या नुकसानीसाठी ही मदत दिली जाते. फळबागा, पशुधन, कुक्कुटपालन आणि घरांच्या नुकसानीसाठीच्या मदतीतही वाढ करण्यात आली. त्यामुळे नुकसानग्रस्तांना पूर्वीच्या तुलनेत अधिक आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुधारित मदत निकष २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून या निकषाची अंमलजावणी करण्याची तरतूद आहे. १ एप्रिल २०२६ नंतर झालेल्या नुकसानीसाठीही सुधारित दर लागू होण्याची शक्यता आहे.

आधी निकषांना
मंजुरी आवश्यक
केंद्र सरकारने मदतीच्या निकषात बदल करून मदतीची मर्यादा वाढवून दिली असली तरी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निकषांना मंजुरी मिळणे आवश्यक आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊनच त्यानुसार अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे १ एप्रिलनंतर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना वाढीव दराने मदत मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Police Action mod| गंजगोलाईत वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च
05:39
Video thumbnail
Latur Hockey News : राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र मुलींच्या हॉकी संघाला ‘माझं लातूर’चे पाठबळ
02:03
Video thumbnail
Latur Bus Stand : बसस्थानकातील सुरक्षेवरून महिला शिवसैनिक आक्रमक; पोलीस नियुक्तीची मागणी
01:39
Video thumbnail
Latur News : लातुरात गोवा बनावटीच्या दारूचा पर्दाफाश; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त
03:38
Video thumbnail
Latur Cyber Crime : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 28 लाखांची फसवणूक; सहा आरोपी अटकेत
03:28
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
01:29
Video thumbnail
Manoj Jarange|500 कोटींच्या कथित आरोपांवरून शिंदे-फडणवीसांना जरांगेंनी घेरलं
12:51
Video thumbnail
Latur|गुंजन पाटील यांच्या हृदयस्पर्शी कवितांनी व्हिडीएफ बाजारचा समारोप.
10:05
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बची धमकी; न्यायालय परिसर रिकामा, बीडीडीएस तपासणी सुरू
01:35
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेखविरोधात पोक्सो अंतर्गत तिसरा गुन्हा दाखल; तपास एसआयटीकडे
02:43
Video thumbnail
Latur Traffic|लातूरच्या शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प;शहरातील मुख्य रस्त्यावर कोंडी
02:24
Video thumbnail
Nanded|लोह्यात बजाज आणि श्रीराम फायनान्स कार्यालयांची तोडफोड; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
02:19
Video thumbnail
Latur|लातूरच्या अशोक हॉटेल चौकात झाड कोसळले; ऑटोचे नुकसान, जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Nanded|उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते चंद्रकांत शिंदे कुटुंबाला ५ लाखांची मदत
00:41
Video thumbnail
Tuljapur|राणा जगदीशसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारवाडीत जनहिताचे उपक्रम
02:35

Latest news