31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeमनोरंजनलेकाच्या साखरपुड्यामुळे मंजिरी ओक चर्चेत

लेकाच्या साखरपुड्यामुळे मंजिरी ओक चर्चेत

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे लोकप्रिय जोडपं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात प्रहसनांवर मिश्किल प्रतिक्रिया देणारा अभिनेता प्रसाद ओक कायम चर्चेत असतो.केवळ प्रसाद ओक नाही तर त्याची बायको मंजिरी ओकही रील्समुळे घराघरांत पोहोचली आहे. मंजिरी ही निर्मातीही आहे. अलीकडेच प्रसाद ओक आणि मंजिरी ओक लेकाच्या साखरपुड्यामुळे चर्चेत होते. दोन-तीन महिन्यांपूर्वी प्रसाद आणि मंजिरीच्या मुलाचा साखरपुडा झाला.

साखरपुड्यातील फोटो व्हायरल झाल्यामुळे मनोरंजनसृष्टीसह अनेक चाहत्यांनीही दोघांवर भरभरून अभिनंदनाच वर्षाव केला. योगायोग म्हणजे एकीकडे ‘लाडकी विहीण योजना’नावाचं नाटक मंजिरी करत होती त्याचवेळी ती ख-या आयुष्यातही विहिणीची भूमिका निभावत होती. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लेकाच्या साखरपुड्याविषयी, सुनेविषयी सांगितलंय. तिच्या प्रतिक्रियेची सध्या चर्चा रंगली.

लेकाच्या साखरपुड्याबद्दल बोलताना ती म्हणाली, इंडस्ट्रीतील अनेकांना माझ्या मुलाचा साखरपुडा झाला याचा शॉक बसला. अनेकजण म्हणाले, दोघं खूप लहान आहेत. लहान वयात मलांचे लग्न करताय का? पण तसे नाही. आम्ही आता मुलाचे लग्न करण्याच्या मार्गावर आहोत. माझा मुलगा आता २५ वर्षांचा आहे. तो जर्मनीला असतो. तो शिकला तिथेच. तिथेच नोकरी करतो. ब-यापैकी सेटल आहे. अर्थात त्याला खूप काम करायचे आहे. पण तरीही हळूहळू त्याची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे असं वाटलं की त्याचा साखरपुडा करून टाकूया. आणि हा साखरपुडा खूप अचानक ठरला. आमच्यासाठीही अचानक होतं. अर्थात त्यामुळेच कुठे त्याचा गाजावाजा करणार नव्हतो. पण आमची मैत्रीण अमृता खानविलकर तिने एक स्टोरी टाकली आणि ते अर्थात सगळ्यांना कळले. अर्थात ती वाईट गोष्ट नाही, चांगलीच गोष्ट आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR