लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि २०  मे रोजी खासदार डॉ. शिवाजी काळगे, महापौर  जयश्रीताई सोनकांबळे यांच्या  हस्ते हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील युवकांमध्ये दडलेली क्रीडा प्रतिभा पुढे आणण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असून, या स्पर्धेची संकल्पना माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  अभय साळुंके, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा  कारखाना व्हाईस चेअरमन अशोकराव काळे, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, रेणा कारखाना चेअरमन अनंतराव देशमुख, रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उमाकांत खलंग्रे, पंचायत समिती उपसभापती महेश चव्हाण, सुहास कदम, दत्तात्रय शिंदे,जिल्हा युवक काँगेस अध्यक्ष निलेश देशमुख,जिल्हा बँक संचालक अनिताताई केंद्रे, स्वयंप्रभा पाटील,बाजार समिती संचालक प्रकाश सुर्यवंशी, प्रमोद कापसे, अ‍ॅड. समद पटेल, संतोष देशमुख, रविंद्र काळे, अनुप शेळके, प्रदीप राठोड,  मारुती पांडे, सचिन पाटील, विश्वजीत पाटील, शेषराव हाके पाटील, राजकुमार पाटील, प्रविण सुर्यवंशी, सोनू डगवाले, गणेश ढगे, प्रविण माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळत  असल्याचे सांगितले. अशा स्पर्धांमधून अनेक गुणवंत खेळाडूंना मोठ्या स्तरावर संधी मिळू शकते, असा  विश्वास व्यक्त करून आयोजक माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे त्यांनी कौतुक केले. उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद
मिळवली.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18
Video thumbnail
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जळकोट तालुक्यात 'केमिस्ट'चा कडकडीत बंद; तहसीलदारांना निवेदन!
02:05
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|ED च्या रडारावर प्रा. शिवराज मोटेगावकरांची बेहिशोबी संपत्ती?
05:06
Video thumbnail
ब्रेकिंग : मोटेगावकरांच्या पत्नीला देखील CBI ची नोटीस
02:09
Video thumbnail
'लातूर पॅटर्न' : एका शैक्षणिक क्रांतीचा उगम, सुवर्णकाळ आणि बदलत्या प्रवासाचा अंतर्वेध
06:11
Video thumbnail
नांदेडमध्ये डिझेलचा तुटवडा; वाहनधारकांची परवड, तर जिल्हाधिकाऱ्यांचा 'पायी चालण्याचा' अजब सल्ला!
03:03
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46

Latest news