लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेत युवकांचा थरार

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि २०  मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. उद्घाटनानंतर प्रत्येक्ष स्पर्धेला सुरुवात झाली आणि युवकांचा थरार पहावयास मिळत आहेग्रामीण भागातील युवकांमध्ये दडलेली क्रीडा प्रतिभा पुढे आणण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार असून, या स्पर्धेची संकल्पना माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची आहे.
बुधवारी औसा वॉरियर्स विरुद्ध जळकोट टायटन्स सामन्यात जळकोट टायटन्सने एकतर्फी सामना जिंकला. औसा वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात सर्वबाद ७५ धावा केल्या. जळकोट टायटन्सने एक गडी गमावून केवळ ६.३ षटकात विजयाची नोंद केली. लातूर सीटी किंग्ज इलेव्हन विरुद्ध शिरुर अनंतपाळ स्ट्रायकर सामन्यात लातूर सीटी किंग्ज इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ३ गडी गमावून १२३ धावा केल्या. प्रत्युत्तरात शिरुर अनंतपाळ स्ट्रायकरला १० षटकात ५ गडी गमावून १२२ धावा करता आल्या. लातूर सीटी किंग्ज इलेव्हन संघाने केवळ एका धावेने सामना जिंकला.
ग्रामीण इंडियन्स विरुद्ध उदगीर युनायटेड सामन्यात ग्रामीण इंडियन्सने १० षटकात ६ गडी गमावून ९८ धावा केल्या. उदगीर युनायटेडने १० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात ८७ धावा केल्या. ग्रामीण इंडियन्सने ११ धावांनी सामना जिंकला. चाकुर चार्जरस विरुद्ध निलंगा नाईट्स या सामन्यात चाकुर चार्जरसने १० षटकात ६ गडी गमावून १०४ धावा केल्या तर निलंगा नाईट्सला ९ गडी गमावून केवळ ७७ धावा करता आल्या. २७ धावांनी चाकुर चार्जरसने सामना जिंकला. देवणी डेअरडेव्हील विरुद्ध अमदपूर अ‍ॅसेसिन्स यांच्यात झाला. या सामन्यात देवणी डेअरडेव्हल्स संघाने १० षटकात ७ गडी गमावून ९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात अहमदपूर अ‍ॅसेसिन्सने १० षटकात सर्व गडीबाद ८७ धावा केल्या. देवणी डेअरडेव्हील्सने ५ धावांनी विजयाची नोंद केली.  लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेत बुधवारप्रमाणेच गुरुवारीही क्रिकेट सामन्याचा थरार पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहूण क्रीडा प्रेमी भारावून जात आहेत.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
शिव ठाकरेच्या अमरावतीतील घरी फराह खान यांची सरप्राईज भेट; शिवच्या आजीच्या हातच्या भाकरीवर मारला ताव
00:31
Video thumbnail
लातूरमध्ये खुराणा ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप!
00:35
Video thumbnail
लातूर पॅटर्नचे यश, आव्हाने आणि भविष्य; पहा काय म्हणाले डॉ.सोमनाथ रोडे!
24:00
Video thumbnail
हिंगोलीत डिझेल टंचाईचे संकट! शेतीच्या कामासाठी पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या किलोमीटर लांब रांगा
03:11
Video thumbnail
NEET पेपर फुटी प्रकरण: डॉ. मनोज शिरुरेंच्या पत्नीची CBI कडून कसून चौकशी; धक्कादायक माहिती समोर
03:11
Video thumbnail
उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
09:33
Video thumbnail
लातुरात डॉ. मनोज शिरुरेंच्या नातेवाईकांवर CBI चा छापा; दोन तास चौकशी, मोठी रोकड जप्त!
03:00
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58

Latest news