परभणी : तालुक्यातील लोहगाव येथे दि. २७ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद अंतर्गत परभणी तालुक्यात एकाच दिवशी एकाच वेळी सर्व ग्रामपंचायतमध्ये वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात आली. यात लोहगाव येथे ११०० वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.
वृक्ष लागवड मोहिममेचा शुभारंभ पंचायत समिती परभणी गटविकास अधिकारी पी. एम. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, शाळेच्या परिसरात व ग्रामपंचायत बाजार मैदानावर वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड मोहिमेस प्रशासक तथा विस्तार अधिकारी पंचायत आर.जी.सुर्यवंशी, ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानोबा दुधाटे, मुख्याध्यापक अमृत देशमुख, सयद रिझवान, शिक्षक नामदेव खुळे, डॉ. सुप्रिया धाडकर, आरोग्य सेविका श्रीमती ज्योती नळदकर, संजय कनसटवाड संदिप हारगावकर, दिपक देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी विजय देशमुख, रमेश राऊत, अशोक तिडके उपस्थित होते.
















