लातूर : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीव्हीआर चौक ते छत्रपती चौक जाणारे वळण रस्त्यावरील आठवण ढाब्यावर दारू पिण्यासाठी व जेवण करण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांना काचेच्या बाटल्या व फरशीच्या तुक्डयाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी सेवा पुरवणा-या ढाबा मालकासह पाच जणांविरोधात गन्हा दाखल करण्यात आला असून सदर ठिकाणी वाढदिवसाची पार्टी होती व तिचे रूपांतर हाणामारीत झाल्याची चर्चा असून या घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीसांकडून केला जात आहे.
शनिवार दि. २८ रोजी रात्री ९ वाजनेच्या सुमारस पिव्हीआर चौक ते छत्रपती चौक जाणा-या वळण रस्त्यावर माऊंट लिटल शाळेसमोरील आठवण ढाब्यावर फिर्यादी संगमेश्वर शिवराज स्वामी रा. दादोजी कोंडदेव नगर हे त्यांच्या एका मित्रासह दारू पिण्यासाठी व जेवण करण्यासाठी गेले असता ढाबा मालक अमोल दावतपुरे हे सेवा पुरवत होते. या दरम्यान बाजुच्या टेबलवर वाढदिवसाची पार्टी सुरू होती अशी चर्चा असून सदर टेबलवरती बसलेले शेंडगे, सुमित सगर व त्याच्या साबतचे दोन अनोळखी इसम गोधंळ करीत असल्याने फिर्यादी संगमेश्वर शिवराज स्वामी यांनी मला फोनवर आवाज येत नाही हळू बोला असे म्हणटले असता या कारणावरून फिर्यादी संगमेश्वर शिवराज स्वामी व त्यांचा मित्र हा ढाब्यातून बाहेर आला असता त्यांना भर रस्त्यावर शेंडगे, सुमित सगर व त्याच्या साबतचे दोन अनोळखी इसमांनी त्यांना काचेच्या बाटल्या व फरशीच्या टुकड्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची तसेच लाथा बुक्याने मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी संगमेश्वर शिवराज स्वामी याच्या फिर्यादीवरून सेवा पुरवणा-या ढाबा मालक अमोल दावतपुरे याच्यासह शेंडगे, सुमित सगर व त्याच्या साबतचे दोन अनोळखी इसमा विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलीसांकडून केला जात आहे.

