27.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रशाहु महाराजाविरोधात गद्दाराला उभे केले : आदित्य ठाकरे

शाहु महाराजाविरोधात गद्दाराला उभे केले : आदित्य ठाकरे

कोल्हापूर : शाहू महाराज उमेदवार म्हणून उभा राहिल्यानंतर समोर कुणी उभे राहायला नको होते, पण शाहू महाराज यांच्या विरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असे वाटत नव्हते, अशा शब्दात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवरून तोफ डागली. कोल्हापूर लोकसभेचे शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची सभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी बोलताना आदित्य यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. एकही भूल कमल का फूल असा प्रतिसाद नागरिक देतात, एक मन की बात नहीं होगी सब के मन की बात होगी, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, शाहू महाराज घराण्याचे आणि माझ्या घराण्याचे वेगळे नातं आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांनी पुढे सांगतिले की, देशाच्या हितासाठी आम्ही महाविकास आघाडी निर्माण झाली होती. २०१९ साली बंटी साहेब यांनी मला सांगितले होते, आदित्य काळजी करू नको आमचे ठरले आहे. त्यांनी सांगितले की, भाजपच्या ४०० पारचे आता तडीपार होणार आहे. यावेळी समोरून तोच आवाज येताच त्यांनी एका कार्यकर्त्याला व्यासपीठावर बोलवून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ते म्हणाले की, दहा वर्षे हे सरकार एका व्यक्तीचे एका पक्षाचे होत. तुम्ही फक्त मन की बात ऐकायचं, तुमचे कधी ऐकले आहे का? १० वर्षांपूर्वी जे जुमले होते त्याचे नाव आता केवळ गॅरेंटी हे नाव दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR