विराट कामगिरीने आरसीबीचा विजय

बंगळुरू : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील ३४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला विजयरथ कायम राखत गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने युवा सलामीवीर साई सुदर्शनच्या शानदार खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २०६ धावांचा भक्कम डोंगर उभारला. पण विराट कोहली पुन्हा एकदा ‘चेस मास्टर’ ठरला. त्याने तुफानी फलंदाजी करत डाव सांभाळला आणि निर्णायक क्षणी फटकेबाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटी आरसीबीने ५ गडी राखून हा सामना जिंकला.

गुजरात टायटन्सची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी रचली. सुदर्शनने आक्रमक फलंदाजी केली. त्याला गिलने संयमी खेळ करत साथ दिली. मात्र, गिल २४ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. तथापि, साई सुदर्शन शेवटपर्यंत ठाम उभा राहिला आणि त्याने आयपीएलमधील तिसरे शतक पूर्ण केले. ५७ चेंडूत त्याने शतक झळकावले. त्यानंतर बटलरने १६ चेंडूत २५ धावा केल्या. शेवटच्या षटकांत वॉशिंग्टन सुंदर (१२ चेंडूत नाबाद १९) आणि जेसन होल्डर (१० चेंडूत नाबाद २३) यांनी जोरदार फटकेबाजी करत गुजरातचा स्कोर २०६ पार नेला.

या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला सुरुवातीलाच धक्का बसला. विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी डावाची सुरुवात तुफानी केली. परंतु मोहम्मद सिराजने बेथेलला बाद केले. त्याने १० चेंडूत १४ धावा केल्या होत्या. यानंतर कोहलीला देवदत्ता पडिक्कलची साथ लाभली आणि दोघांनी दुस-या विकेटसाठी ११५ धावांची भक्कम भागीदारी रचली. पण रशीद खानने पडिक्कलला बाद करत ही जोडी फोडली. पडिक्कलने २७ चेंडूत ५५ धावांची तुफानी खेळी केली.
दरम्यान, कोहलीनेही आक्रमक फलंदाजी कायम ठेवत शानदार ८१ धावांची खेळी साकारली. जेसन होल्डरने त्याला बाद केले. कोहलीने ४४ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ८१ धावा ठोकल्या. मात्र त्यानंतर आरसीबीचा डाव थोडा डगमगला. जितेश शर्मा १० धावा करून पुन्हा राशिद खानचा बळी ठरला तर मानव सुथारने कर्णधार रजत पाटीदारला ८ धावांवर माघारी धाडले. शेवटी कृणाल पांड्या आणि टीम डेव्हिड यांनी शांतपणे डाव सावरत आरसीबीला विजय मिळवून दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news