40.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे

शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे

पुणे : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४३ लाख २८ हजार ९५४ पुरुष, ३९ लाख ६३ हजार २६९ स्त्री तर ७२८ तृतीयपंथी अशा एकूण ८२ लाख ९२ हजार ९५१ मतदारांची नोंद झाली आहे.

सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आदी ठळक सुविधांसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी शहरी भागात प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR