सहकार महर्षी क्रिकेट टर्फ-२०२६ चे विजेतेपद जागृती शुगरकडे

लातूर : प्रतिनिधी
मांजरा परिवाराचे आधारस्तंभ माजी मंत्री, सहकार महर्षी  दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजीत केलेल्या मांजरा परिवाराअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता सहकार महर्षी क्रिकेट टर्फ-२०२६ स्पर्धेचे विजेतेपद  जागृती शुगरच्या संघाने१५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले, द्वितीय क्रमांक टेवन्टी-वन शुगर्स संघाने ११ हजार तर तृतीय क्रमांक विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने ७ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. बेस्ट बॉलर दीपक ढगे, जागृती शुगर व बेस्ट बॅस्टमन कोटे विजेंद्र, जागृती शुगर यांनी पटकवला. अंतिम सामन्यात जागृती संघाने ट्वेन्टी-वन शुगरचा पराभव करत प्रथम विजेतेपद पटकावले माजी मंत्री, सहकार महर्षी क्रिकेट टर्फ-२०२६ यामध्ये मांजरा परिवारातील  रेणा साखर, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर, जागृती शुगर, विलास साखर युनिट-१, विलास साखर युनिट-२, टे्वन्टी-वन शुगर, मांजरा  शुगर्स, मारुती महाराज साखर या संघाने स्पर्धेत भाग घेतला होता.
सदरील  स्पर्धेचे दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता कारखान्याचे व्हाइस चेअरमन व संचालक मंडळाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तद्नंतर स्पर्धा सुरू झाल्या. अंतीम सामना हा जागृती शुगर व टे्वन्टी-वन शुगर्स यामध्ये झाला यामध्ये जागृती शुगर्स यांनी सहकार महर्षी क्रिकेट टर्फ-२०२६ चे विजेतेपद पटकावले. प्रमुख पाहुणे जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव ट्वेन्टी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, माजी चेअरमन सर्जेराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रविण पाटील यांच्यासह मान्यवरांच्या  हस्ते विजेत्या संघांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह वितरण करण्यात आले. यावेळी अंतीम सामन्याचे टॉस प्रमुख पाहुणे लक्ष्मणराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मांजरा परिवारातील सर्व संस्थांचे संचालक मंडळ, सर्व कार्यकारी संचालक अधिकारी कर्मचारी खेळाडू उपस्थित होते.
रेणा संचालक विरुद्ध रेणा अधिकारी यांच्यात सामना झाला. त्यात संचालक मंडळाने विजय मिळवला. यावेळी रेणाचे  संचालक मंडळ  सर्वश्री चंद्रकांत पाटील, धनराज गोविंद पाटील, शंकर पाटील, रणजीत पाटील, बालाजी हाके, संग्राम माटेकर, सतीश पवार, तुकाराम कोल्हे, तानाजी कांबळे, स्नेहलराव देशमुख, पंडितराव माने, चंद्रचूड चव्हाण, इंगळे, संभाजी रेड्डी यांच्यासह जागृती शुगरचे जनरल मॅनेजर गणेश येवले, विलास साखर कारखाना युनिट-२ चे कार्यकारी संचालक पवार, ट्वेन्टी वन शुगरचे कार्यकारी संचालक संतोष बिराजदार, माध्यम समन्वयक हरीराम कुलकर्णी उपस्थित होते. सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठीं सहकार महर्षी क्रिकेट टर्फ-२०२६ टुर्नामेंट  रेणाचे कार्यकारी संचालक  बी. व्ही. मोरे, सचिव रविशंकर बरमदे व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news