29.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeलातूरसाठवण तलावावरील ४७ विद्युत मोटारींची वीज खंडित

साठवण तलावावरील ४७ विद्युत मोटारींची वीज खंडित

जळकोट : प्रतिनिधी
तालुक्यात कमी पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील बहुतांश साठवण तलाव कोरडे आहेत. अनेक साठवण अतिशय कमी पाणीसाठा आहे परंतु हा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित असतानाही काही शेतकरी विद्युत मोटारी लावून शेतामधील पिकांना पाणी देत होते. ही माहिती तहसीलदार सुरेखा स्वामी यांना कळताच त्यांनी तलावावर उपस्थित राहून महावितरणचे अधिकारी, तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी व तलाठी यांच्या उपस्थितीत तब्बल ४७ विद्युत मोटारींची विज जोडणी खंडित केली आहे.
तालुक्यात डोंगरगाव, रावणकोळा,माळहिप्परगा, हळद वाढवणा या साठवण तलावात  ब-यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यात कमी झालेल्या पावसामुळे शेतक-यांंचे वैयक्तिक बोर तसेच सिंंचन विहिरीही  कोरड्या पडल्या आहेत. यामुळे शेतात पाणी पिण्यासही मिळणे अवघड होऊन बसले आहे. पुढील एप्रिल मे आणि जून हे तीन महिने पाणीटंचाईचे असणार आहेत. या काळात तालुक्यामध्ये प्रचंड पाणीटंचाई जाणवणार आहे. अशा स्थितीत रावणकोळा भागात साठवण तलावात ब-यापैकी पाणीसाठा आहे परंतु या ठिकाणचा पाणीसाठा उपसला जात आहे . या ठिकाणी पाणी राहिले तर तालुक्याला टँकरद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी जळकोट प्रशासनाने या तलावातील पाणीसाठा वाचवण्यासाठी कंबर कसली आहे.  याबाबत तहसीलदार स्वामी, तलाठी भिसे यांच्यासह महावितरणचे कर्मचारी कार्यवाही करीत आहेत..  यापुढे शेतक-यांंनी तलावामध्ये मोटारी लावून पाणी उपसण्याचा  प्रयत्न केल्यास  कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR