41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeनांदेडकंधार तालूक्यातील अनेक गावात पाणी टंचाईच्या झळा

कंधार तालूक्यातील अनेक गावात पाणी टंचाईच्या झळा

कंधार: प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील घागरदरा ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या पट्टाचा तांडा येथे आत्तापासुनच नागरिकांना पाणी टंचाईला सामारे जावे लागत आहे . प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे येथे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे येथील तांडावासीयानी बोलून दाखवले आहे.त्यामुळेच म्हणावे लागते जाणवताच उन्हाळा चालू झाल्या पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या असुन प्रशासनाणे तातका उपाय योजणा करावी असी मागणी करण्या येत आहे.

आमच्या पाचवीला सटवीने पुंजले का साहेब , आम्ही पोट भरण्यासाठी वीटभट्टी , ऊसतोडीच्या कामासाठी सहा सहा महीने गाव सोडुन बाहेर जातो व सुगी संपताच गावी परत येतो. परंतु गावात आल्यावर सुद्धा आमच्या नशीबी पाण्यासाठी भटकंतीच करण्याची वेळ येते, त्या साठी प्रशासनाने कायम स्वरुपी पाणी पुरवठा योजना करून द्यावी.

आम्ही पिण्यासाठी घागरभर पाणी आणुन आमची तहाण भागवतो खरे पण आमचे जनावरे आम्ही कुठे घेऊन जावे , आमच्या लहाण लहाण मुलाला कडेला घेऊन पाण्यासाठी सहकुटुंब आम्हाला भटकंती करावी लागत आहे . तेही मिळेल तेथुन पाणी आणावे लागते प्रशासनाने यासाठी काही तरी उपाय करावेत आसी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
कंधार तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली असून लोक प्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईविषयी नागरीकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र अद्यापही कांही कामे अर्धवट राहील्यामुळे नागरीकांना अता पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. योग्यवेळी नियोजन केले असते तर कांही प्रमाणात पाण्याची समस्या सुटली असती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष करुन पाणी टंचाईकडे गांभीर्याने लक्ष दिले नाहीत. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट तालुक्यातील अनेक गावांना निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा वेळेत करावा अशी मागणी नागरीकांतून होत
आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR