साता-यात हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार

सातारा : शहरात आजपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचा थरार रंगणार असून, देशभरातील नामांकित मल्ल, प्रशिक्षक आणि पंच मोठ्या संख्येने साता-यात दाखल झाले आहेत. छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणा-या या स्पर्धांसाठी अत्याधुनिक पद्धतीने तयारी करण्यात आली असून, मैदानासह प्रेक्षक गॅलरी, मल्लांची निवास व्यवस्था, पंचांसाठी स्वतंत्र सुविधा तसेच सुरक्षेची व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील विविध राज्यांतील मल्ल आज साता-यात दाखल झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी आयोजकांनी विशेष नियोजन केले होते.

स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर १५ मे रोजी मल्लांची ओळख परेड, वजन नोंदणी प्रक्रिया तसेच पंचांच्या उपस्थितीची अधिकृत नोंदणी पार पडली. तब्बल तीनशे पंच या स्पर्धांचे परीक्षण आणि देखरेख करणार असून, त्यामुळे स्पर्धा अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. विविध वजनी गटांतील कुस्तीगीरांनी आज सराव सत्रात सहभाग घेतला.

यावेळी तालीम संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पैलवान साहेबराव पवार यांनी छत्रपती शाहू स्टेडियमला भेट देत स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. मैदानाची मांडणी, मातीची गुणवत्ता, स्पर्धकांसाठी करण्यात आलेल्या सुविधा तसेच पंचांच्या व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली. यावेळी समन्वयक दीपक पवार आणि सुधीर नाना पवार उपस्थित होते. त्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांच्या माध्यमातून व्यापक नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली.

देशभरातील मल्लांची हजेरी
हिंदकेसरी स्पर्धांमध्ये देशातील अव्वल दर्जाचे मल्ल सहभागी होणार असल्याने कुस्तीप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील मल्ल या स्पर्धेत आपली ताकद आजमावणार आहेत. काही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले पैलवानही या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. साता-याची ऐतिहासिक कुस्ती परंपरा आणि शाहू महाराजांनी दिलेले प्रोत्साहन यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, पुढील काही दिवस सातारा शहरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news