सोलापुरात अपघातात तिघे ठार

भरधाव इरटिगाची थांबलेल्या आयशरला धडक, ३ मित्रांचा मृत्यू, दोघे गंभीर
सोलापूर : प्रतिनिधी
भरधाव इरटिगा कार रस्त्यावर थांबविलेल्या आयशर वाहनाला पाठीमागून धडकून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघे मित्र जागेवर ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले. तिघांपैकी एक जणाचा खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला. हा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री १ वाजता पुणे-हैदराबाद बायपास मार्गावरील डी मार्ट-पर्ल गार्डन जवळ घडला.

अमोल धैर्यशील येरटे (४० वर्ष, रा. दाळगे प्लॉट, भवानी पेठ, सोलापूर), शेखर सुरेकर (३३ वर्ष, रा. कुमठा नाका, सोलापूर) आणि कादर सैदू हांडे (३३ वर्ष, रा. कुमठा नाका, सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्या तिघा मित्रांची नावे असून त्यातील कादर सैदू हांडे याचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर स्वरुप कोथींबिरे (२७ वर्ष, जुनी मिल चाळ, सोलापूर) आणि अमित राजेश जाधव (३० वर्ष, रा. पांडुरंग वस्ती, शास्त्रीनगर, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.

वरील पाचही मित्र हे मध्यरात्री पुना नाका येथील एका ढाब्यावर जेवण करून इरटिका कार (क्रमांक एमएच १३ ईके ७२०१) मधून घराकडे जात होते. त्यावेळी त्यांची कार हैदराबाद बायपास रस्त्यावरील डी मार्ट-पर्ल गार्डनजवळ उभ्या असलेल्या आयशरवर (क्रमांक एमएच १३ सीयू ८६९९) पाठीमागून आदळली. या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, इरटिगा कार तब्बल दीडशे मीटर फरफटत जाऊन त्यावरील पत्र्याचे छत पूर्ण कापले गेले.

दरम्यान अपघाताची खबर समजताच जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचून मृतदेह शव विच्छेदनासाठी पहाटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. यातील मयत शेखर सुरेकर हा अविवाहित असून तो एका खासगी फायनान्स कंपनीत कामास होता. त्याच्या पश्चात आई आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दुसरा मयत अमोल येरटे हा अक्कलकोट रोडवरील आदर्श सुझुकीमध्ये सिनिअर मॅनेजर म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. तसेच तिसरा मयत कादर हांडे हा आदर्श सुझुकीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news