हिंगोली भूकंपाने हादरले, १५ गावांत जोरदार धक्के

हिंगोली : प्रतिनिधी
हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना हिंगोलीच्या औंढा व कळमनुरी तालुक्यातील १५पेक्षा अधिक गावांत हादरे बसले. भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये नागरिक झोपेत असताना भूकंप झाल्याने १५ तालुक्यांत एकच धावपळ उडाली. नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. काही सेकंदांसाठी जमीन हादरली पण त्यामुळे एकच खळबळ उडाली. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

मंगळवारी सकाळी पाच वाजून ५५ मिनिटांनी हिंगोलीमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. दरम्यान कळमनुरी तालुक्यातील माळधामणी गावात सुरेश बांगर यांच्या दुकानापुढे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात भूकंपाचे दृश्य कैद झाले आहे. या आधी देखील पिंपळदरी, पांगरा शिंदे, बोल्डा, रामेश्वर, आमदारी या गावांतील परिसराला भूकंपाचे हादरे बसले आहेत. आज सकाळी झालेल्या या भूकंपाची लातूर येथील भूमापक केंद्रावर नोंद करण्यात आली.

वापटी, कुपटी, खांबाळा, खापरखेडा, शिरली, राजवाडी, बोलडा, आमदरी, राजदरी, पिंपळदरी जामगव्हाण, नांदापूर व इतर गावांमध्ये या आधी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

३.५ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप असल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे.
मागील पाच वर्षांपासून या भागात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. कधी सकाळी, दुपारी तर कधी संध्याकाळी हे भूकंपाचे हादरे नागरिकांना बसत आहेत. मात्र अनेक वेळा या धक्क्यांची तीव्रता कमी-जास्त असल्याने नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह केंद्र शासनाच्या पथकाने देखील या परिसरात येऊन पाहणी केली आहे. नागरिकांनी भूकंपाच्या वेळी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news