पंतप्रधान मोदींनी पीडित पालकांची भेट घेतली का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चेन्नईत नीट परीक्षेत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करीत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही. पण त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी, असे म्हटले. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे पालकांना शोक करताना पाहण्यापेक्षा अधिक वेदनादायी काहीच नाही.

नीट पेपरफुटी झाल्यापासून पंतप्रधानांनी ना पीडित पालकांची भेट घेतली, ना अशा कोणत्याही विद्यार्थ्यासोबत बसले आहेत, ज्याचे भविष्य या पेपरफुटीमुळे उद्ध्वस्त झाले. पंतप्रधानांनी शुक्रवारी रात्री 11 वाजता एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, ज्यात ते म्हणाले, ह्लजंतर मंतर येथील आंदोलनादरम्यान काही मुलांनी मला आणि माझ्या आईला शिवीगाळ केली, पण मला त्या मुलांना माफ करायचे आहे, कारण बालपण हे चुका सुधारण्याचा काळ असतो.

राहुल गांधी ट्विट करत काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ज्या पालकांनी आपली मुले गमावली आहेत, त्यांचे अश्रू आणि आक्रोश यापेक्षा मोठे दु:ख दुसरे नाही. हे दु:ख त्यांच्यासोबत कायम राहील आणि या तुटलेल्या व भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेबद्दल अनेक प्रश्नही निर्माण करते. पेपरफुटी, रद्द झालेल्या परीक्षा, एका क्षणात वाया गेलेली वर्षानुवर्षांची तयारी, आपल्या विद्यार्थ्यांना अशा व्यवस्थेत प्रामाणिकपणे काम करण्यास सांगितले जाते, जी स्वत:च अप्रामाणिक आहे. आणि तरीही पंतप्रधानांमध्ये विद्यार्थ्यांना ह्लमाफह्व करण्याबद्दल बोलण्याचे धाडस आहे. ज्यांनी आपले मूल गमावले आहे, किंवा ज्यांची बचत, आयुष्य, वेळ आणि स्वप्ने पेपरफुटीमुळे हिरावली गेली आहेत, अशा एकाही शोकाकुल कुटुंबाला ते भेटले का? उत्तर आहे, नाही. भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी.

जे मतदारसंघ पुनर्रचनेचे समर्थन करणार ते देशद्रोही
चेन्नई दौ-यात राहुल गांधी यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ह्लमतदारसंघ पुनर्रचना हा तामिळनाडूच्या जनतेचे मतदानाचा हक्क काढून घेण्याचा कट आहे. यामुळे तामिळनाडू कमकुवत होईल असे ते म्हणाले. त्यांनी याला भाजपचा कट म्हटले. ह्लजो कोणी मतदारसंघ पुनर्रचनेचे समर्थन करतो, तो तामिळनाडूशी गद्दारी करत आहे. ही तामिळनाडूच्या भविष्याशी केलेली गद्दारी आहे असे ते म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06
Video thumbnail
Latur|वडवळमध्ये घाणीचं साम्राज्य; ग्रामस्थांचा संताप
01:39
Video thumbnail
Purna|५० वर्षांचा गौरवशाली प्रवास! पूर्ण्यात जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव
01:48
Video thumbnail
Latur|हैदराबादपेक्षाही भव्य? लातुरात उभारला जाणार 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज'
02:14
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा परिणाम; लातूरची सिटी बस सेवा पुन्हा सुरू
03:24
Video thumbnail
Latur|साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
02:14
Video thumbnail
Nanded|२०२६ मध्येही अशी अवस्था! गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ
02:13
Video thumbnail
Nanded|हद्दपार आरोपीची किनवटच्या रस्त्यांवर पोलिसांनी काढली धिंड!
00:28
Video thumbnail
Latur|धावत्या ई-बाईकला अचानक आग; दोन स्फोटांनी उडाली खळबळ!
00:31
Video thumbnail
Nanded|MPSC मध्ये प्रथम आलेला अधिकारी लाचप्रकरणात अटकेत; संपत्तीची चौकशी सुरू
02:19
Video thumbnail
Latur|लातूरची सिटी बस सेवा ५ दिवसांपासून बंद; प्रवाश्यांचे हाल
03:29
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59

Latest news