नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एसपी) प्रमुख शरद पवार यांच्यासह १९ नवीन आणि पुन्हा निवडलेल्या राज्यसभा सदस्यांनी सोमवारी शपथ घेतली. शरद पवार व्हीलचेअरवर शपथ घेण्यासाठी संसदेत पोहोचले.
शपथ घेणा-यांमध्ये ५ महाराष्ट्राचे, ३ ओडिशाचे, ६ तामिळनाडूचे आणि ५ पश्चिम बंगालचे सदस्य आहेत. राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांना शपथ देण्यात आली. १६ एप्रिलपासून तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. खरे तर, १० राज्यांमधील ३७ राज्यसभा जागा २ एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. या जागांसाठी २६ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित ११ जागांवर १६ मार्च रोजी मतदान झाले होते.
खासदारांचा शपथविधी अशा वेळी झाला, जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू नव्हते. मात्र, यावेळी उपसभापती हरिवंश आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. किरेन रिजिजू यांनी महिला आरक्षण सुधारणा विधेयकाबाबत सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले. महिला आरक्षण सुधारणा विधेयकासाठी संसदेचे विशेष अधिवेशन १६ एप्रिलपासून बोलावले जाईल. १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी सभागृहात महिला आरक्षण कायद्यातील सुधारणेशी संबंधित महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा केली जाईल.
शपथ घेणा-या नवनिर्वाचित खासदारांची नावे
महाराष्ट्र
शरद पवार
माया चिंतामन इवनाते
रामराव सखाराम वडकुते
ज्योती नागनाथ वाघमारे
रामदास आठवले
ओडिशा
मनमोहन सामल
संत्रुप्त मिश्रा
दिलीपकुमार राय
पश्चिम बंगाल
बाबुल सुप्रियो
बिस्वजीत सिन्हा
मेनका गुरूस्वामी
राजीव कुमार
रुख्मीणी मलिक
तामिळनाडू
कॉन्स्टेंटाइन रविंद्रन
क्रिस्टोफर मैनिकम
एल के सुधीश
एम थंबीदुरई
तिरुची शिवा
अंबुमणी रामदास

