एक टन ई-कच-यातून २०० ग्रॅम सोने काढले

छत्रपती संभाजीनगर : ‘कचरा’ म्हणजे केवळ समस्या नव्हे, तर तो हजारो कोटींचा ‘खजिना’ असू शकतो, हे छत्रपती संभाजीनगरमधील एका मराठमोळ्या संशोधिकेने जगाला दाखवून दिले. शासकीय विज्ञान संस्थेतील प्राध्यापिका डॉ. पूजा सोनवणे यांना त्यांच्या ई-कचरा व्यवस्थापनावर केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधन पुरस्काराने गौरवण्यात आले. देवभूमी उत्तराखंड विद्यापीठात दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यानझालेल्या ६६ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. सोनवणे यांचा ‘एएमआय स्प्रिंगर नेचर’कडून ३०० युरो मूल्याचे ‘स्प्रिंगर व्हाउचर’ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

ई-कचरा निर्मितीमध्ये भारत सध्या अमेरिका आणि चीननंतर जगात तिस-या क्रमांकावर आहे. ही गंभीर समस्या भविष्यात मोठी डोकेदुखी ठरू शकते. याच धोक्यावर डॉ. सोनवणे यांनी ‘बायोलीचिंग’ नावाचे एक शक्तिशाली स्वदेशी तंत्रज्ञान वरदान ठरेल, असे संशोधन केले. डॉ. सोनवणे यांनी सिद्ध केले की, टाकून दिलेले जुने मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही आणि सर्व्हर व सर्किट बोर्ड्स अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तांबे, निकेल, झिंक, टीन, अ‍ॅल्युमिनियम यांसारखे मूलभूत धातू तसेच सोने, चांदी, पॅलेडियम आणि प्लॅटिनम यांसारखे मौल्यवान धातू दडलेले आहेत. ‘बायोलीचिंग’ प्रक्रियेद्वारे हे धातू पर्यावरणपूरक पद्धतीने आणि कमी खर्चात पुनर्प्राप्त करता येतात.

भारत ई-कचरा व्यवस्थापनात ‘लीडर’ बनू शकतो
डॉ. सोनवणे यांच्या मते, ‘‘ई-कचरा व्यवस्थापन ही केवळ पर्यावरण समस्या नाही, तर मोठी आर्थिक संधी आहे. हायब्रीड तंत्रज्ञान आणि कठोर नियम लागू करून भारत लवकरच या क्षेत्रात जागतिक ‘लीडर’ बनू शकतो.

बायोलीचिंग प्रक्रियेतून ‘खजिना’ मिळणार
ई-कचरा निर्मितीच्या गंभीर समस्येवर ‘बायोलीचिंग’ ही कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया वरदान ठरू शकते, हे या संशोधन सादरीकरणातून अधोरेखित केले. बायोलीचिंग म्हणजे विशिष्ट सूक्ष्मजंतूंचा उपयोग करून धातू असलेल्या खनिजांमधून किंवा ई-वेस्टमधून धातू वेगळे काढण्याची प्रक्रिया. हे सूक्ष्मजंतू आम्ल किंवा ऑक्सिडायझिंग संयुगे तयार करून खनिजांचे विघटन करतात आणि त्यातून मौल्यवान धातू मुक्त करतात. ही प्रक्रिया वापरून १ टन सर्किट बोर्ड्स आणि सर्व्हरच्या ई-कच-यात १५०-२०० ग्रॅम सोने, ८००-१००० ग्रॅम चांदी, १५०-२०० किलो तांबे आणि पॅलेडियमचे अंश मिळू शकतात.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Accident|रेणापूर हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू
00:44
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
00:00
Video thumbnail
LIVE-वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार सोहळा
02:08:35
Video thumbnail
Latur Contractar Sucide|कंत्राटदाराच्या मृत्यूचं गूढ डायरीत? ११ जणांवर गुन्हे दाखल!
02:59
Video thumbnail
Latur|“58 पोलिसांवर कारवाई... आता लातूरकरांचा नंबर? 1 सप्टेंबरपासून हेल्मेटसक्तीचा कडक नियम!”
07:09
Video thumbnail
Latur|आई आणि दोन चिमुकले मृत्यूच्या दारातून परतले; नागरिकांनी दाखवलं धाडस
06:02
Video thumbnail
Latur|नियम नसतील तर मनमानी? क्लासेस चालकांना विरोधकांचा सवाल
03:49
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये क्लासेस चालकांचा एल्गार! शासनाच्या प्रस्तावित कायद्याविरोधात आंदोलन
03:03
Video thumbnail
Nanded|आरोपीला घेऊन निघाले पोलिस, वाटेत झाला हल्ला अन् आरोपी झाला पसार!
01:16
Video thumbnail
Nanded|धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 17 सप्टेंबरला परभणीत एल्गार
01:53
Video thumbnail
Latur|हेल्मेट सक्तीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांची ‘एन्ट्री’ थेट नागपूरहून!
05:16
Video thumbnail
Latur|हा रस्ता आहे की तळं? पाहा लातूरच्या मुख्य चौकाची अवस्था
04:09
Video thumbnail
Latur Ground Report|रस्ता की तळं? दमदार पावसानंतर सिद्धेश्वर मंदिरामागील रस्ता पाण्यात!
02:45
Video thumbnail
Nanded| उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी नांदेडमध्ये मराठा आंदोलन! ‘वापस जा’च्या घोषणा
01:58
Video thumbnail
LATUR|पाऊस बरसला... पिकांना नवसंजीवनी; मात्र पाणीटंचाईची चिंता कायम
02:01

Latest news