नवी दिल्ली : दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी तपास यंत्रणा ईडीने तीन आरोपींना अटक केली आहे. झिशान हैदर, जावेद इमाम, दाऊद नसीर अशी अटक आरोपींची नावे आहेत. तिघांनाही दिल्ली कोर्टाने १४ दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे, जिथे एजन्सी त्यांची चौकशी करेल. हे सर्वजण आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या जवळचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी ईडीने अमानतुल्ला खान यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी तपास यंत्रणेने दिल्लीतील पाच ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. ईडीने अमानतुल्ला खान यांच्या घरावरही छापा टाकला होता. दिल्ली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या दोन एफआयआर अंतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे. ही एफआयआर दिल्ली वक्फ बोर्डातील नोक-यांमधील अनियमिततेशी संबंधित आहे. अमानतुल्ला खान हे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत.
अमानतुल्ला खान यांच्यावर दिल्ली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी ३२ जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्यांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्या आहेत. त्यांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दिल्ली वक्फ बोर्डाच्या तत्कालीन सीईओंनी अशा बेकायदेशीर भरतीविरोधात निवेदन जारी केले होते.
‘आप’च्या ३ बड्या नेत्यांना अटक
सध्या आम आदमी पक्षाचे तीन मोठे नेते दोन वेगवेगळ्या प्रकरणात अटकेत आणि तुरुंगात आहेत. हे नेते आहेत बेहिशोबी मालमत्ता आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले सत्येंद्र जैन, मद्य धोरण घोटाळ्यात सीबीआयच्या ताब्यात असलेले मनीष सिसोदिया आणि ईडीच्या ताब्यात असलेले संजय सिंह. दारू धोरण घोटाळा आहेत.