27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदेशातील ८० कोटी जनता आयते बसून खातेय

देशातील ८० कोटी जनता आयते बसून खातेय

रेशन बंद करा; सदाभाऊ खोतांचे वादग्रस्त वक्तव्य

बुलडाणा : आपल्या देशातील ८० कोटी जनता ही ऐतखाऊ असल्याचे धक्कादायक वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केले आहे. या लोकांची रेशन व्यवस्था बंद करून देशाला बलशाली करावे असेही ते म्हणाले आहेत. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खोत बुलडाण्यात आले होते.

शेतीवर अवलंबून असलेला आता ४० टक्केच समाज उरला आहे. देशात ८० कोटी लोक आयते बसून खात आहेत. यामुळे या लोकांची रेशन व्यवस्था बंद करावी, अशी मागणी खोत यांनी केली आहे. जर एवढी माणसे आयते खात असतील तर हा देश भिका-यांचा आहे. माणसांना भिकारी बनविण्याचे काम सुरूआहे असे खोत म्हणाले आहेत.
सर्वांना फुकट वाटण्याची राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. हे फुकट, ते फुकट असे करता करता भिका-यांचा देश बनत चालला आहे. प्रत्येकाने कष्ट करावेत, त्यातूनच देश बलशाली होईल असेही खोत म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे गरिबांना रेशन देण्याची महत्त्वाकांक्षी योजना मोदी सरकार राबवित आहे. काँग्रेसनेही यापूर्वी या योजना राबविल्या आहेत. परंतु, मोदी सरकारने या धान्यात वाढ केली आहे. या योजनेला मोदी सरकार प्रचाराचा मुद्दा बनवत असताना भाजपाप्रणीत युतीत असूनही खोत यांचे असे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.

सदाभाऊ खोत यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. टोमॅटो मिळाला नाही म्हणून कोणी मेलं का? असा सवालही खोत यांनी विचारला होता. राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद, शरद पवारांना सैतान म्हणत त्यांना आता गोळ्या घालणार का, असेही खोत म्हणाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR