31.3 C
Latur
Tuesday, May 21, 2024
Homeराष्ट्रीय९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

रायपूर : वृत्तसंस्था
छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियानाला एक मोठे यश आले आहे. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत ९ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला नक्षलींचा समावेश आहे. मंगळवारी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्याच्या सीमेवर ही चकमक झाली. गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी याची माहिती देताना एक व्हीडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटले की, राज्यातील नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश आले असून ९ नक्षलवाद्यांना ठार करणे ही मोठी कामगिरी सुरक्षा रक्षकांनी केली आहे. यासाठी सोमवारी २९ एप्रिलच्या रात्री ही मोहीम सुरु करण्यात आली होती. नारायणपूर आणि कांलकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील अभुजमाद भागात ही चकमक पार पडली. मंगळवारी पहाटे ६ वाजता ही चकमक सुरु झाली. टेकमेटा आणि केकूर गावातील जंगलात ही चकमक झाली. या मोहिमेत डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड आणि स्पेशल टास्क यांनी या नक्षलविरोधी मोहिमेत मोठी कामगिरी बजावली. अभुजमाद हा भाग रेड कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरु आहे.

३ महिला नक्षलवाद्यांचा समावेश
या ९ नक्षलवाद्यांमध्ये ३ महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून या चकमकीत सुरक्षा रक्षकांना कुठलीही हानी झालेली नाही. पण या नक्षलवाद्यांकडून एके ४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच इतर स्फोटके आणि बंदुकीच्या गोळ््याही जप्त करण्यात आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR