जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप आणि वाकयुद्धाचे पर्यावसान विधिमंडळाच्या आवारातच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्यामध्ये झाले होते. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिस ताब्यात घेण्यासाठी आले असताना पोलिसांचे वाहन अडवल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी परवा विधिमंडळाच्या आवारात एकमेकांना डिवचले होते. त्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली असतानाच काल जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळ परिसरामध्येच धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीमध्ये सहभागी असलेले जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस आले असताना आव्हाड यांनी पोलिसांच्या कारसमोर झोकून देत अटकेला विरोध केला होता.

त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना उचलून तिथून बाजूला केले होते. तसेच नितीन देशमुख यांला पोलीस ठाण्यात नेले होते. दरम्यान, आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड हे विद्यमान आमदार असल्याने विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने त्यांच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
NEET Paper Leak: लातूरमध्ये सीबीआयची मोठी कारवाई; पाचवा नामांकित डॉक्टर रडारवर, चौकशी सुरू!
03:29
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून सुटका
01:42
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशीपला तुफान प्रतिसाद
08:56
Video thumbnail
Nanded|नांदेड जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस;विळेगाव थडी येथे मंडप उडाला
00:32
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये इंधन टंचाई नसल्याचा प्रशासनाचा दावा;डिझेल साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
02:49
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|पुरावे नष्ट करण्यासाठी पेपर रद्दीत ? CBI ची मोठी चौकशी
02:26
Video thumbnail
Nanded|खड्ड्यामुळे दुचाकीचा भीषण अपघात ; संतप्त नागरिकांचा रस्ता रोको
03:02
Video thumbnail
Congress Protest|उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक आक्रमक;जिल्हा उद्योग केंद्राच्या नोटीसची होळी
04:52
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
00:00
Video thumbnail
LIVE-नीट पेपर फुटी संदर्भाने काँग्रेसकडून आंदोलन
05:51
Video thumbnail
क्रिकेटच्या मैदानावर लातूरच्या मुलींची ऐतिहासिक एन्ट्री; धिरज देशमुख यांच्याकडून कौतुक!
01:46
Video thumbnail
श्वास रोखला अन् क्षणात घात झाला; जिममध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
00:26
Video thumbnail
पाकिस्तान हादरलं! क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेगाडीवर भीषण आत्मघाती हल्ला; २४ हून अधिक सैनिकांचा
00:55
Video thumbnail
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सावरखेड मार्गावर धावली एस.टी. बस; ग्रामस्थांचा पेढे वाटून जल्लोष!
01:46
Video thumbnail
BREAKING: ट्युशन एरिया केवळ उद्योगांसाठीच राखीव; नियमबाह्य व्यवसाय बंद करण्याचे आदेश, परिसर सामसूम!
02:20

Latest news