केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने परदेशातून आयात केल्या जाणा-या कापसावरील सीमा शुल्क रद्द केले आहे. १९ ऑगस्ट २०२५ पासून हा निर्णय लागू झाला आहे. त्यामुळे भारतातील कापूस उत्पादक शेतक-यांची चिंता वाढू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराआधी आयात सीमा शुल्क रद्द करण्याची घटना घडली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड टॅरिफ भारतावर लादल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. टॅरिफच्या मुद्यावरून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका आणि अमेरिकेसोबत होऊ घातलेल्या व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कापूस आयातीबद्दल निर्णय घेतला आहे. सोमवारी (१८ ऑगस्ट) रात्री केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने यासंदर्भातील अधिसूचना काढली आहे. परदेशातून आयात केल्या जाणा-या कापसावर ११ टक्के सीमा शुल्क होते.

परदेशातून आयात केल्या जाणा-या कापसावर १९ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सीमा शुल्क रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाचा अमेरिकेतील निर्यातदारांना थेट फायदा होणार आहे. अमेरिकेतील निर्यातदारांकडून भारतीय बाजारातील निर्बंध कमी होण्यासाठी भर दिला जात होता. दरम्यान, अमेरिकेने भारताकडून जास्त टॅरिफ वसूल केला जात असल्याचा आरोप करत ५० टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे या निर्णयाने काही प्रमाणात भारतीय वस्त्रोद्योगालाही दिलासा मिळणार आहे. भारतीय वस्त्रोद्योगाला अमेरिकेच्या ६० टक्के टॅरिफमुळे झटका बसला आहे.

कृषि, डेअरी सेक्टर खुले करण्याची मागणी
अमेरिकेकडून सातत्याने भारतावर कृषि आणि डेअरी सेक्टर खुले करण्यासाठी जोर दिला जात आहे. दोन्ही देशातील व्यापार करारही रखडला आहे. दोन्ही देशातील शिष्टमंडळामध्ये लवकरच व्यापार कराराबद्दल चर्चा होणार असून भारताने कापूस आयातीवरील सीमा शुल्क कमी अमेरिकेला भारताची भूमिका लवचिक असल्याचा मेसेज दिल्याचा अर्थही निर्णयानंतर लावला जात आहे. अमेरिकेचे शिष्टमंडळ ऑगस्टमध्येच भारत दौ-यावर येणार होते. पण, हा दौरा रद्द करण्यात आला. २५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत अमेरिकेचे शिष्टमंडळ दाखल होणार होते. आता नव्याने दौ-याची तारीख जाहीर केली जाणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53

Latest news