Homeमनोरंजनमाधुरीच्या भन्नाट नृत्याने नेटक-यांना भुरळ

माधुरीच्या भन्नाट नृत्याने नेटक-यांना भुरळ

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलीवूडची धकधक गर्ल अर्थात सर्वांची लाडकी अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या हटक्या स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असून, तिच्यासंबधीचे काही व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत असते. नुकताच अभिनेत्रीने स्व:ताचा भन्नाट डान्स रील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केला आहे.

या व्हिडीओत तिचा हटके अंदाच चाहत्यांना हसवत आहे. अभिनेत्री माधुरी दिक्षिताच चाहतावर्ग खूप मोठा आहे. चाहत्यांना माधुरीच्या रील नेहमीच भुरळ पाडत असतात. या नव्या रीलमध्ये अभिनेत्रीने तिच्या मैत्रिंणीसोबत जबरदस्त डान्स केला आहे. ‘कहीं आग लगे लग जावे’ या गाण्यावर तिने डान्स केला आहे. हे गाणं १९९९ मध्ये रिलीज झालेल्या ताल या सिनेमातले आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन, अक्षय खन्ना आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. या व्हिडीओवर चाहते आणि नेटक-यांकडून कमेंट्साचा वर्षाव होत आहे. व्हिडीओमध्ये माधुरी गॉगल लावून स्वॅगमध्ये डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेह-यावरचे हावभावाने सर्वांनाच घायाळ केलं आहे.

९० च्या दशकात माधुरीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. आजही माधुरीच्या अभियाच्या जादू तिच्या सिनेमांमध्ये पाहायला मिळते. भूल भुलैय्या ३ या सिनेमात ती शेवटची दिसली होती. यामुळे तिचा पुढचा सिनेमा कधी भेटीला येणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR