Homeमुख्य बातम्यासायबर भामट्यांकडून ‘एसआयआर’चा स्कॅम

सायबर भामट्यांकडून ‘एसआयआर’चा स्कॅम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. यामुळे लोक घाबरून जात असून बळी पडत आहेत. ‘एसआयआर’ फॉर्म स्कॅम नावाच्या या फसवणुकीत, सायबर ठग स्वत:ला निवडणूक अधिकारी किंवा बीएलओ म्हणून सांगत आहेत व समोरील व्यक्तीला लुबाडत आहेत.

तुमचे एसआयआर व्हेरिफिकेशन अपूर्ण आहे आणि तुमचे नाव मतदार यादीतून त्वरित काढून टाकले जाईल. असे सांगणारे फोन मतदारांना येऊ लागले आहेत. मतदार यादीतून नाव काढण्याच्या धमकीमुळे लोक घाबरून जात आहेत आणि याच गोष्टीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत.

व्हेरिफिकेशन पूर्ण करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, असे सांगितले जाते. हा ओटीपी मिळाल्यावर गुन्हेगार तुमचा युपीआय अ‍ॅप, बँक खाती, ईमेल आणि सोशल मीडिया अ‍ॅक्सेस करून तुमची आर्थिक फसवणूक करतात.

काही प्रकरणांमध्ये, ठग ‘एसआयआर’ फॉर्म डाउनलोड करा असे सांगून एक फेक लिंक किंवा एपीके फाईल पाठवतात. या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतो आणि तुमचा डेटा चोरीला जातो. ज्या राज्यांत ‘एसआयआर’ प्रक्रिया सुरु आहे, त्या राज्यात जास्त उत्पात माजविला जात आहे. या राज्य सरकारांनी या फसवणुकीबाबत अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR