34.3 C
Latur
Wednesday, April 8, 2026
Homeराष्ट्रीयजम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलन

जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलन

यूपी-एमपी आणि राजस्थानमध्ये वादळी पाऊस

शिमला : देशात पाठोपाठ दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे हवामान बदलले आहे. आज यूपी-राजस्थानसह २० राज्यांमध्ये वादळी वा-यासह पावसाची शक्यता आहे. तर १० राज्यांमध्ये गारपीट होऊ शकते.

जम्मू-काश्मीरमधील रामबन येथे भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद झाला. तर हिमाचलमधील चंबा येथे मंगळवारी सकाळी भूस्खलनामुळे बांधकाम सुरू असलेला पूल तुटला. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मंगळवारी संध्याकाळी उशिरा धुळीचे वादळ आले. १० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला, अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळले. राजस्थानमधील उदयपूरमध्ये वादळामुळे घराची भिंत कोसळली, तर वाळवंटी जिल्हे जैसलमेर-नागौरमध्येही पावसाव्यतिरिक्त गारपीट झाली.

वादळाचा अलर्ट
मध्य प्रदेशच्या वरच्या भागात ३ चक्रीवादळ (सायक्लोनिक सर्कुलेशन) सक्रिय आहेत. यामुळे १८ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा अलर्ट आहे. मंगळवारी १९ जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ३० ते ५० किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात. आसाम-मेघालयमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे, तर मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

अनेक भागांमध्ये गारपीट
राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (पश्चिमी विक्षोभ) प्रभाव आजही राहील. मंगळवारी १० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. काही भागांमध्ये १ इंचपर्यंत पाऊस झाला. त्याचबरोबर अनेक भागांमध्ये गारपीटही झाली. हवामान थंड झाल्यामुळे कमाल तापमानात ७ अंशापर्यंत घट झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR